पि.एस.कौसडीकर सेवानिवृत्त

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

 सेवागौरव सन्मान.


सेलू : सेलू दि.30 एप्रिल मंगळवार रोजी शहरातील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय येथील माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक पि. एस. कौसडीकर सेवानिवृत्त झाल्याबद्दल शहरातील सामाजिक कार्यकर्ते आपला_माणूस सुनिल गुलाबराव गायकवाड, सतीश जाधव अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष, प्रशांत ठाकूर सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने सेवानिवृत्त निमित्त्त सेवागौरव सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय नागरे,मुख्याध्यापक बालासाहेब हळणे, शेषराव कौसडीकर, शोभा कौसडीकर,
पल्लवी कौसडीकर सिध्दार्थ एडके आदि उपस्थित होते. 
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, प्रदिप शेषराव कौसडीकर सर
नियत वयोमानानुसार आज दि. ३०एप्रील २०२४ रोजी आपण मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त होणार आहात.
आपल्या एकंदरीत तीस वर्षाच्या सेवाकार्यात आपण विद्यार्थिप्रिय शिक्षक, उत्तम मार्गदर्शक, सहकार्य पूर्ण मुख्याध्यापक असा ठसा उमटवलेला आहे.सामाजिक, सांस्कृतिक कार्यात आपण सर्वतोपरी सहभाग नोंदवलाआहे.  समाजातील आणि प्रशालेच्या प्रत्येक घटकांशी आपले स्नेहपूर्ण असे नाते आहे. विकल्पाने अशा व्यक्ती दृष्टीक्षेपात येतात. आम्ही विद्यार्थी आणि आता नागरीक या नात्याने आपणांस नेहमी पाहत आलो आहोत. आपली वृत्तीआणि वागणूक याचे निकोप दर्शन कायम घडले आहे. 
आज जरी निरोप प्रसंग असला तरी मला खात्री आहे भविष्यात आपण कायम आमच्या मागे नेहमीप्रमाणे खंबीरपणे असणार, आपले आशीर्वाद नेहमीच सोबत  असणार. 
ह्या प्रसंगी आपणास आपल्या भावी आयुष्यासाठी भरभरुन शुभेच्छा देत आहोत. आपल्या आयुष्यात आनंदाची बाग नेहमी फुलत राहो. चेह-यावर हास्याची लकेर अखंड राहो हीच मनापासून सदिच्छा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.