चोकाक ते उदगांव दरम्यान नवीन नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी सुरु असलेले मोजणीचे काम शेतकर्यांनी पाडले बंद.
चोकाक ते उदगांव दरम्यान नवीन होणार्या नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी मजले (ता.हातकणंगले) येथे सुरु असलेले मोजणीचे काम शेतकर्यांनी सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास बंद पाडले. त्यानंतर राष्ट्रीय प्राधिकरण व भुमिअभिलेख कार्यालयाच्या कर्मचार्यांनी पोलिस बंदोबस्त बोलावून घेतल्याने शेतकर्यांनी आक्रमक भुमिका घेतली. यावेळी हातकणंगले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी भुसंपादन उपजिल्हाधिकारी विवेक काळे व प्रकल्प संचालक यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर शेतकर्यांच्या विरोधांची भुमिका लक्षात घेवून आचारसंहिता होईपर्यत मोजणीचे काम थांबविणेबाबात उपजिल्हाधिकारी काळे यांनी सुचना केल्या.
कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय प्राधिकरण, भुसंपादन उपजिल्हाधिकारी व कृती समितीची 12 मार्च रोजी बैठक झाली होती. यात चोकाक ते उदगांव-अंकली दरम्यान फक्त डिमार्केशन करण्याचा निर्णय झाला होता. मात्र राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने डिमार्केशन पुर्ण करून आता मोजणीला सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसापुर्वी चोकाक येथे शेतकर्यांनी मोजणी बंद पाडली होती. दरम्यान, ज्या दिवसी मोजणी त्या तारखेच्या नोटीसा, अनेकांना वॉटसापवरून नोटीसा पाठविल्या आहेत. नोटीस किमान तीन दिवस आगोदर देणे आवश्यक होते. अशाच प्रकार मजले येथे झाला. त्यामुळे सोमवारी मजले येथे मोजणी सुरु असताना राष्ट्रीय प्राधिकरण, भुमिअभिलेखचे कर्मचारी व कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील, शेतकरी यांनी मोजणीचे काम बंद पाडण्यावरून वाद झाला.
अखेर घटनास्थळी हातकणंगले पोलिसांनी धाव घेतली. यावेळी पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी भुसंपादन उपजिल्हाधिकारी विवेक काळे यांच्याशी संपर्क केला. यावेळी उपजिल्हाधिकारी काळे शेतकर्यांचा विरोध असेल तर निवडणुकीचा कालावधी संपेपर्यत मोजणी थांबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मजलेच्या सरपंच मधुमती पाटील, विजय पाटील, पोलिस पाटील मिनाक्षी पाटील, अनिल पाटील, उमेश सुर्यवंशी, किरण पाटील, सचिन पाटील, जिनगोंडा पाटील, विनोद पाटील, तेजपाल पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
टिप्पण्या