साईबाबा नागरी बँके ला 4 कोटी 37 लाखाचा नफा.
सेलू :- सेलू येथील सतत दहा वर्षा पासून बॅको पुरस्कार, महाराष्ट्र स्टेट कॉ ऑप असोसिएशन चा पद्मभूषण कै वसंत दादा पाटील उत्कृष्ट नागरी सह. बंक पुरस्कार, व बेस्ट चेअरमन पुरस्कार मिळवनाऱ्या साईबाबा बॅकेच्या मार्च 2024 अखेर सर्व टॅक्स व तरतुदी वजा जाता 1कोटी 90 लाख रूपये नफा झाला आहे. यात ढोबळ नफा 4 कोटी 37लाख झाला आहे संपलेल्या आर्थिक वर्षात बँक कडे भाग भांडवलं 6 कोटी 2 लाख आहे एकून स्व निधी 15 कोटी 83लक्ष आहे मार्च अखेर ठेवी 210 कोटी 68 लाख आहेत. कर्ज वाटप120 कोटी आहेत. बँकेचे नेट एन पि ए 0.% ग्रास एन. पि. ए. 6.28 % आहे. एकूण सभासद 8896 आहेत. सर्व शाखा नफ्यात आहेत. दहा वर्षा पासून सभासद ना 10% वाटप करीत आहोत. या पुढे बँकेचा
नेट एन .पि. ए .श्यून्य टक्के राहील या दृष्टीं ने नियोजन असल्याचे माहिती पत्रकार परिषद मध्ये संस्थापक अध्यक्ष आडळकर हेमंतराव यांनी दिली . ग्राहकांनी जास्ती जास्त ए टि एम, पि ओ एस, इ कॉम, मोबाईल बँकिंग, क्यू आर कोडं,आय एम पि एस, आर टि जी एस,युपीआय अशा आधुनिक तंत्र ज्ञान व सुविधा चा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले आहे. बँके च्या सर्व स्तरावर प्रगती मध्ये बँकेचे सभासद,संचालक मंडळ,ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक,कर्मचारी यांनी केलेल्या अमूल्य सहकार्य साठी आभार मानले. तसेच या प्रसंगी कै. अण्णा साहेब काकडे सेवाभावी संस्था तर्फे सन्मान करत्त्वचा पत्रकार क्षेत्रा मध्ये मोहन बोराडे यांना मिळाला या बद्दल सत्कार करण्यात आला या वेळी बँकेचे उपाध्यक्ष मुळावेकर चंद्रशेखर मुख्यकार्य कारी अधिकारी रामराव लाडाने, व्यवस्थापक निसार पठाण सभासद रफिक भाई उपस्थिती होती कार्यक्रम चे प्रस्ताविक व आभार रामराव लाडाने यांनी केले.
टिप्पण्या