महाराष्ट्र आणि मॉरिशस आंतर सांस्कृतिक संबंध दृढ !
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ आणि महावीर महाविद्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मॉरिशस येथील मराठी सांस्कृतिक मंडळ आणि मराठी मंडळ यांच्यावतीने शिविम संशोधन पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांची जयंती ही साजरी करण्यात आली. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या वतीने मॉरिशस येथे घेतलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातील विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी.मॉरिशस सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख अर्जुन पुतळाजी म्हणाले, महाराष्ट्र आणि मॉरिशस यांचा सांस्कृतिक संबंध दृढ असून येथील लोककला आणि लोक परंपरांचे संवर्धन मॉरिशस मधील मराठी मंडळ करत आहे. मराठी मंडळाचे अध्यक्ष नितीन बापू यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे होते. प्राचार्य लोखंडे म्हणाले, मॉरिशस मधील मराठी विद्यार्थ्यांना आमच्या महाविद्यालयामध्ये मराठीचे शिक्षण घेण्यासाठी नेहमीच प्रवेश खुला असून आमचे महाविद्यालय त्यासाठी त्यांचे स्वागत करीत आहे. मारिशसच्या विद्यार्थ्यांनी महावीर महाविद्यालयात प्रवेश घ्यावा. शिवमचे माजी अध्यक्ष शिवकुमार सोनाळकर, प्रा.डॉ. अनिल गवळी,प्रा.डॉ. यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिविमचे अध्यक्ष भरत जाधवांनी केले तर महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर डॉ. शरद गायकवाड यांनी भाष्य केले. मराठी भाषा आणि साहित्य तसेच महाराष्ट्रातील लोककला यांचे संवर्धन होण्याविषयी या वेळेला कलाकारांशी चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. मानतेश हिरेमठ यांनी केले . मारिशस येथील मराठी भाषिक २५ कलाकारांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. जयवंत दळवी यांनी केले.
टिप्पण्या