शिरोळ तालुक्यात वळीव पावसाची दमदार हजेरी

शिरोळ प्रतिनिधी 
शिरोळ तालुक्यात  बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वळीव पावसाने दमदार हजेरी लावली अचानक आलेल्या पावसाने नागरिकांना सुख:द धक्का दिला शिरोळच्या आठवडी बाजारात व्यापारी भाजी विक्रेते आणि ग्राहकांची तारांबळ उडाली
गेल्या अनेक दिवसापासून हवेत उष्मा अधिक जाणवत होता उष्माने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होऊन जीव कासावीस होत होता अति उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते त्यामुळे एखादा वळीव पाऊस या परिसरात पडावा अशी अपेक्षा नागरिकांची होती बुधवारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना सुख:द धक्का मिळाला
बुधवारी सकाळपासूनच हवेत उष्मा अधिक जाणवत होता ढगाळ वातावरण असूनही  उष्मा अधिक असल्यामुळे दुपारच्या वेळी तर रस्ते अक्षरशा ओस पडले होते सायंकाळी चार नंतर गारपिटाबरोबरच वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने दमदार हजेरी लावली यामुळे काही काळ हवेत गारवा निर्माण झाला पाऊस झाल्यानंतर पुन्हा हवेत उष्मा निर्माण झाला अचानक आलेल्या पावसामुळे शिरोळ शहरातील श्री बुवाफन मंदिरासमोर भरणाऱ्या आठवडी बाजारातील भाजी विक्रेते व्यापारी ग्राहकांची अक्षरशः तारांबळ उडाली होती पण पाऊस होणे गरजेचे असल्यामुळे पहिल्यांदा पडलेल्या वळीव पावसाचा आनंद सर्वांनी घेतला बालचमुने  रस्त्यावर येऊन पावसात भिजत नाचत आलेल्या पावसाचे स्वागत केले अनेक जण पडलेल्या गारा वेचण्यात मग्न झाले होते
आज पडलेला पाऊस हा काही पिकांना पोषक ठरला ऊस मक्का हंगामी भाजीपाला यांना पाऊस पोषक ठरला आहे तर हरभरा ज्वारी गव्हाची मळणी झाली असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली होती एप्रिल  महिना मध्यावर आला असून नदीपात्र अनेक ठिकाणी कोरडे पडले आहेत अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत होती त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्व नागरिकांच्याबरोबरच शेतकऱ्यांनी आज पडलेल्या पावसामुळे समाधान व्यक्त केले
 फोटोबालचमुने  रस्त्यावर येऊन पावसात भिजत नाचत आलेल्या पावसाचे स्वागत केले अनेक जण पडलेल्या गारा वेचण्यात मग्न झाले होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.