हातकणंगले तालुका बांधकाम शाखा अभियंतापदी आकाश गिरी यांची वर्णी. खोतवाडी ग्रा.पंचायतीला सदिच्छा भेट.
खोतवाडी - हातकणंगले तालुका पंचायत समिती बांधकाम शाखा अभियंतापदी नुकतीच आकाश गिरी यांची वर्णी लागली आहे.
बांधकाम शाखा अभियंता चव्हाण यांचे प्रमोशन झाल्यामुळे त्यांच्या जागी आकाश गिरी यांची नियुक्ती झाली आहे.
आज बांधकाम शाखा अभियंता आकाश गिरी यांनी खोतवाडी ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा बुके देवून सत्कार करण्यात आला.
या भेटी दरम्यान बोलताना गिरी म्हणाले, तुमच्या अनुभवातून आणि अधिकारातून गावच्या विकासासाठी जी काही कामे असतील ती करूया, एकमेकांच्या सहकार्याने चांगली कामे करू असा विश्वास आकाश गिरी यांनी व्यक्त केला.
यावेळी सरपंच विशाल कुंभार, उपसरपंच गजानन नलगे, ग्रामसेविका निता बोंदर्डे,करण खोत, अमर खोत, वैभव पवार, अर्जुन रजपूत, माजी सरपंच संजय चोपडे, असिस्टंट पंकज कवडे नाना कांबळे आदी उपस्थित होते.
टिप्पण्या