केरूर ता. चिक्कोडी येथे जमीनवादातून एकाचा खून

चिकोडी प्रतिनिधी
केरूर (तालुका चिकोडी) येथे जमीन वादातून एकाचा मारहाणीत  मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 12 वाजता घडली असून सदर घटनेमध्ये केरूर गावचा रहिवासी मल्लाप्पा शंकर नावी (वय 55 ) याचा याच गावातील चौघा जणांनी मारून खून केल्याची तक्रार मृत मल्लाप्पाचा मुलगा एकनाथ मल्लाप्पा न्हावी याने अंकली पोलीस स्थानकात तक्रार दिली असून अंकली पोलीस स्थानकाचे फौजदार काडप्पा जकन्नवर  पुढील तपास करीत आहेत. 
  याबाबत समजलेले माहिती अशी केरूर (तालुका चिकोडी) या  गावातील रहिवासी असलेले मल्लाप्पा शंकर नावी व शंकर खामकर व इतरांच्यात शेत जमिनीत वाद सुरू असून आज सकाळी मयत मल्लाप्पा  शंकर नावी त्याच्या मुलासह शेतातील काटेरी झुडपे तोडत असताना दुपारच्या वेळी आरोपी शंकर कामकर व त्याच्या मुलांनी ही झुडुपे तोडण्यास मनाई केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. 
त्याबाबत तक्रार करण्यासाठी एकनाथ नावी अंकली पोलीस ठाण्यास गेला. परत शेतात येवून पाहता मल्लाप्पा नावी बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यानंतर एकनाथ वडिलांना उपचारासाठी चिकोडीकडे नेत असताना त्याचा वाटेत मृत्त्यु झाला.
 एकनाथ याने आपल्या वडिलांचा कामकर कुटुंबीयांनीच मारहाण  करून खून  केल्याचा संशय अंकली पोलीस स्थानकात व्यक्त केला. तसेच शंकर कामकर, ज्योतिबा कामकर , बाळू कामकर, महांतेश कामकर या चौघांनी आपल्या वडिलांचा मारहाण करून खून केल्याची तक्रार  दाखल केली आहे. त्यानुसार अंकली पोलीस स्थानकांत तशी नोंद करण्यात आली आहे. मात्र मयत  मल्लाप्पा शंकर   नावी याचा मारहाणीत  मृत्यू झाला की अन्य कोणत्या कारणाने मृत्यू झाला याचा तपास शव विच्छेदानानंतरच समजणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.