जनवाड येथे लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवार कुमारी प्रियांका जरकिव्हळी यांची प्रचार सभा विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न.

सदलगा प्रतिनिधी -  
चिकोडी तालुक्यातील जनवाड  या गावी महादेव स्वामी धर्मरमठ देवस्थानातील  सभा मंडपात आज आगामी लोकसभा चिकोडी मतदार क्षेत्राचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार कुमारी प्रियंका जारकिव्हळी यांची प्रचार सभा विकास रत्न विधान परिषद सदस्य सन्माननीय श्री प्रकाश अण्णा हुक्केरी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

 प्रारंभी जनवाड येथील  युवा कार्यकर्ते शितल कुडचे यांनी व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रचार सभेचे प्रास्ताविक भाषण  केले.
अलीकडेच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे संपूर्ण कर्नाटकातील सर्वाधिक म्हणजे 78 हजाराचे मताधिक्य देऊन जनप्रिय असलेल्या आमदार यादीमध्ये  आमदार गणेश हुक्केरी यांना जसे सर्वाधिक मताध्धिक्याने निवडून दिले, त्याप्रमाणेच यावेळीही लोकसभेसाठी कुमारी प्रियांका जारकिव्हळी यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन सन्माननीय प्रकाश हुक्केरी यांनी उपस्थित मतदार बंधू भगिनी यांना केले.

यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना प्रकाश हुक्केरी यांनी सांगितले की काँग्रेस गॅरंटी कार्ड मधील प्रत्येक विद्यावंत युवकाला उद्योग खात्री, स्वामीनाथांच्या आयोगाप्रमाणे एम पी एस कायदा, प्रत्येक वर्षी एक लाख प्रत्येक घरी कुटुंबाच्या एका महिलेला ,मनरेगा मध्ये भरती झाल्यास प्रति दिवस रुपये 400 राष्ट्रीय कनिष्ठ वेतन, सामाजिक व आर्थिक समानता यासाठी प्रत्येक समुदायाचे सर्वेक्षण यातून सामाजिक न्याय अशा बाबींचा उल्लेख करून काँग्रेस सरकार सर्वसामान्य जनतेसाठी करण्यात येत असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला.
यासाठी यावेळी लोकसभेचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार कुमारी प्रियांका जारकिहोळी यांना आपले अमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने निवडून आणावे असे कळकळीचे आव्हान त्यांनी मतदारांना केले.

यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत अध्यक्षा सौ सुरेखा कोरे, ग्रामपंचायत सदस्य श्री ज्योतिबा मोकाशी, सनातन मगदूम, छकुली कांबळे, कुमार मुधाळे, धोंडीराम पाटील, रामचंद्र मोकाशी, श्रीकांत शांडगे ,सदाशिव पाटील, दयानंद मगदूम ,पीरगौडा चौगुले, पप्पू पाटील, ओमकार पाटील, रामचंद्र चौगुले, नितीन मगदूम, आनंदा मोकाशी, आप्पासाहेब पाटील, सचिन घाटगे, शिवाजी कांबळे. इत्यादी मान्यवरासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते या प्रचार सभेसाठी जनवाड गावातील शेकडो महिला व पुरुष आवर्जून उपस्थित होते. यावेळी काँग्रेस गॅरंटी कार्ड याचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.