ईश्वरसेवा सोशल फौंडेशनच्यावतीने पंचगंगा नदी घाटाची स्वच्छता

इचलकरंजी - 'समाजसेवा हिच ईश्वरसेवा' या वाक्याप्रमाणे आपण ज्या समाजात वावरतो, जगतो त्या समाजाचे काही तरी देणे लागतो या उद्देशाने समाजसेवेच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम, गोर-गरिबांची मदत, आरोग्य शिबीर राबवणे, जनजागृती करणे यासाठी राष्ट्रप्रेमी ग्रुप गणेशोत्सव मंडळ, भोणे माळ येथील सदस्यांकडून चालूवर्षी ईश्वरसेवा सोशल फौंडेशनची स्थापना करण्यात आली.
            समाजाची सेवा करण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून रविवार दि. 14 एप्रिल, 2024 रोजी फॉउंडेशनच्या वतीने इचलकरंजी पंचगंगा नदी घाटावर स्वछता मोहीम राबविण्यात आली. नदी घाटावर पडलेले निर्माल्य, खराब फोटो, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या आणि इतर कचरा एकत्रित करून ते महानगरपालिकेच्या कचराकुंडीत टाकण्यात आले व घाट परिसर स्वच्छ करण्यात आले. या समाजकार्याबद्दल समाजातून सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करून समाधान व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी सर्व सदस्यांकडून येणाऱ्या काळात फौंडेशन च्या वतीने आणखीन चांगली समाज हिताची कामे करणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच फौंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त त्यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी फौंडेशनचे सर्व सभासद उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.