हातकलंगलेत गद्दारांना घरी बसवा मतदारांनी मशाल पेटवा सत्यजित पाटील सरुडकर यांना विजयी करा सुषमा अंधारे

जयसिंगपूर प्रतिनिधी
 वाढती बेरोजगारी  शेतीमालाला भाव नाही महिलांना सन्मान नाही दुसऱ्या  पक्षाचे नेते चोरणाऱ्या आणि पक्षाशी गद्दारी करणाऱ्या गद्दारांना घरी बसून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सत्यजित पाटील सरूडकर यांना विजय करून मशाल पेटवावी असे शिवसेनेच्य उद्धव ठाकरे गटाच्या  सुषमा अंधारेे आवाहन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली
जयसिंगपूर येथील सुदर्शन चौक येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या निवडणूक प्रचार सभेत त्या बोलत होत्या
अंधारे पुढे म्हणाल्या देशामध्ये दहा वर्षात भाजप सरकार आल्यापासून शासकीय नोकर भरती झाली नाही अच्छे दिन चा जनतेला वाईट अनुभव आला मोदींनी गॅरंटी च्या नावाखाली सर्वसामान्यांना फसवले आहे अस्थिर सरकार मुळे उद्योजक महाराष्ट्रात उद्योग सुरू करत नाहीत खासदार संजय मंडलिक यांच्यावर सडकून टीका करत यावेळी चाळीस आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले होते त्यावेळी मंडलिक यांनी आम्ही 24 कॅरेट सोने  आहोत असे म्हटले होते आता तेच शिंदे  गटात सामील होऊन त्यांचे बेन्टेक्स झाले आहे तसेच खासदार धैर्यशील माने व माजी खासदार निवेदिता माने त्यांनी सत्तेसाठी अनेक पक्ष बदलले आहेत गेल्या वेळेला उद्धव ठाकरे यांच्यामुळे खासदार झालेत त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली त्यांनी मिल पण विकली आणि शासकीय अनुदान ही लाटले नदी प्रदूषण मुक्तीचे यांनी नाटक केले तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता खरपूस समाचार घेताना शेट्टी हे शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलन करतात तर कांदा  दूध व इतर पिकांसाठी त्यांचे आंदोलन का  होत नाही परंतु त्यांचे आंदोलन ठरवून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या दारामध्ये केले जातात असा आरोप केला तसेच राजेश क्षीरसागर व महाडिक म्हणजे सत्तेची भेळ तिकडे त्यांचा खेळ  सत्तेचा मेवा जिकडे त्याचा थवा तिकडे अशी यांची अवस्था आहे
काँग्रेसने आपल्या कार्यकाळात अनेक कल्याणकारी योजना राबवल्या त्यांच्या जाहिराती कधीही केले नाहीत परंतु लबाड भाजप सरकारने आपल्या खोट्या कामाच्या विकास जाहिराती करत जनतेची दिशाभूल केली आहे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पक्षातील नेते मंडळींनी अनेक कार्यकर्ते घडले आहेत हा इतिहास आहे मात्र नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी किती कार्यकर्ते घडवले याचे जनतेला त्यांनी उत्तर द्यावे ही लढाई गद्दारा विरुद्ध खुद्धाराची यांची आहे हा विचार प्रत्येकाने मनात घेऊन सत्यजित पाटील सरूडकर यांच्या विजयासाठी मशाल पेटवली पाहिजे असे मत अंधारे यांनी व्क्त केले
 माजी आमदार उल्हास पाटील माजी आमदार सुजित मिनणचेकर मंगलताई चव्हाण रघुनाथ देशिंगे धनाजी पवार राजू चुडाप्पा यांनी मनोगत व्यक्त केले
 यावेळी चंगेजखान पठाण बीजी माने धनाजीराव जगदाळे अमरसिंह निकम बंटी देसाई शेखर पाटील अशोक कोळेकर सर्जेराव शिंदे मधुकर पाटील वैभव ऊगळे युनुस डांगे विक्रम जगदाळे सलीम नदाफ सुदर्शन कदम नितीन बागे संजय चौगुले पराग पाटील तेजस कुराडे बंडा मणियार स्वाती सासने साजिदा घोरी सविता पाटील स्वाती भापकर लक्ष्मण कलगुटगी संजय पाटील कोथळीकर एजाज मुजावर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.