उदगाव येथील खून प्रकरणातील आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी, आणखी दोघांना लवकरच जेरबंद करणार - पो.नि.सत्यवान हाके.

जयसिंगपूर :
कुपवाड येथे 2020 मध्ये दत्ता पाटोळे या तरुणाच्या खुन प्रकरणातील संशयित आरोपीचा पाठलाग करून धारदार हत्याराने वार करून सचिन अज्ञान चव्हाण (वय 24, मुळगाव रा.मु.बसाप्पाचीवाडी पो.कोकळे, ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली, सध्या रा.शाहूनगर जयसिंगपूर) यांचा खुन केल्याची गुरुवारी दुपारी उदगांव (ता.शिरोळ) येथे घडली होती.
या प्रकरणातील साहिल अस्लम समलीवाले (वय 26, रा.वाघमोडेनगर कुपवाड जि.सांगली) व परशुराम हणमंत बजंत्री (वय 25, रा.अलिशाननगर कुपवाड जि.सांगली) यांना निभर्या पथकांच्या पोलिसांनी घटनास्थळाजवळच खुनाच्या घटनेनंतरच लगेच ताब्यात घेतले होते. त्यानंतर जयसिंगपूर व कुपवाड पोलिसांनी प्रथमेश उर्फ गोठ्या आनंदा माने (वय 19 रा.हडको कॉलनी कुपवाड ता.मिरज) व गजानन मनोहर सरगर (वय 41 रा.वाघमोडेनगर कुपवाड ता.मिरज) या दोघांना गुरूवारी रात्री ताब्यात घेतले होते. त्यानंतर शुक्रवारी जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग न्यायालयासमोर या खुनातील संशयित आरोपी चौघांना उभे केले असता. पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, या खुन प्रकरणात अमित बाळू वाघमोडे (रा.वाघमोडेनगर कुपवाड) व सोनल उर्फ तुषार सकळे (रा.बामनोळी ता.मिरज) या दोघांचाही समावेश आहे. त्यामुळे यांना लवकरच जेरबंद करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सत्यावान हाके यांनी पत्रकारांना दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.