यड्राव येथे एकाची गळफास घेऊन आत्महात्या .
यड्राव (प्रतिनिधी ) यड्राव (ता . शिरोळ ) येथील रेणूकानगर येथे श्रीपाद बेकर्स टपरीमध्ये अमोल तुळशीदास शिऊडकर (वय ३८ वर्षे ) याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली . सदरची घटना सोमवार सांय . ७ - ३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली . सदर घाटनेची नोंद शहापूर पोलीस ठाणेस करणेत आली . घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहीत अशी की , मयत अमोल त्याची पत्नी , आई व मुले असे कुटूंबीसोबत रेणूकानगर येथे रहात आहे . अमोल हा आपल्या कुटूंबीयाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी बेकरीचे व खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय टपरीमध्ये करत होता . गेली काही दिवस अमोल व त्याची पत्नी यांच्यात वाद चालू होता . त्या वादातून त्याने टपरीमध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली . सोमवार सांय . ७ -३० वाजता त्याची आई टपरीकडे आली असता सदरची घटना उघडकीस आली . घटनास्थळी शहापूर पोलीस येऊन मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीयतपासणीसाठी पाठविण्यात आला . सदर घटनेचा तपास शहापूर पोलीस करत आहेत . घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती .
टिप्पण्या