एकसंबा येथे ट्रकची स्कूटरला धडक ; एक ठार

एकसंबा प्रतिनिधी

ट्रक आणि दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी एकसंबा - उळागड्डीवाडी रस्त्यावर घडली. अनिल महादेव सांगावे (वय 51 रा. एकसंबा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 
          याबाबत घटनास्थळावरून मिळालेले अधिक माहिती अशी की, सी.बी कोरे कारखान्याकडून एकसंबा कडे येणाऱ्या ट्रक क्रमांक केए 29-9580 ने उळागड्डीवाडी हून एकसंबाकडे येणाऱ्या एक्टिवा केए 23 इआर 9245 ला जोराची धडक दिली. अनिल सांगावे (रा. एकसंबा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर स्कुटीवर असणाऱ्या निर्मला विनायक म्हेत्रे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी चिकोडी येथील इस्पितळात हलविण्यात आले. उळागड्डीवाडी येथे घराचे बांधकाम सुरू असल्याने ते सदर बांधकामास पाणी मारून घरी परतत असताना सदरचा अपघात घडला. दरम्यान अनिल सांगावे यांच्या घरातील मंडळी ज्योतिबा यात्रेनिमित्त ज्योतिबा डोंगरास गेले होते.  त्यांना फोन द्वारे संपर्क साधून बोलाविण्यात आले. 
       घटनेची माहिती मिळताच एकसंबा परिसरातील नागरिक घटनास्थळी गर्दी केली होती. यावेळी सदलग्याचे फौजदार बिरादार, सीपीआय , डीवायएसपी व सहाय्यक घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आला. आण्णासाहेब यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.