पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डासाळा ता. सेलू येथे ग्रेड परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 


 एचएआरसी संस्थेचा उपक्रम.


सेलू : परभणी येथील होमिओपॅथीक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेच्यावतीने बालकांचे मोबाईल व्यसन दूर व्हावे व बालकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी आणि बालकांचा कला विकास मनोरंजक पद्धतीने व्हावा.या उद्देशाने सदरील कार्यशाळेचे आयोजन (ता. ३एप्रिल.) बुधवार रोजी करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठा वर शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. सारिका गजमल   मुख्याध्यापक मधुकर काष्टे , जेष्ठ शिक्षक सदाशिव मुळी,    व कार्यशाळेचे मुख्य प्रवर्तक तथा कला शिक्षक पांडुरंग पाटणकर हे उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन मधुकर काष्टे यांनी केले. कार्यशाळेत पांडुरंग पाटणकर यांनी सकाळ सत्रात ग्रेड परीक्षा विषय, वस्तू चित्र,स्मरण चित्र,
संकल्प चित्र व नक्षीकाम आणि अक्षरलेखन  आदी विषयी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले . या बरोबरच कागदकाम ललित कला विषयी माहिती , टाळ्यांचे प्रकार विविध माध्यम प्रिंट, कोलाज चित्र आणि सुतळी काम या विषयी मार्गदर्शन  केले.
द्वितीय सत्रात शेकोटी कार्यक्रमा वेळी बालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. तल्लीन होऊन शाळेतील मुलांनी कृतीशील सहभाग नोंदविला. यावेळी ३०० विध्यार्थी सहभागी होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती कीर्ती आंबेकर यांनी केले तर आभार सय्यद करीम यांनी मानले.  कार्यक्रम यशस्वीते साठी सचिन गायकवाड, गणेश कांबळे, श्रीमती पुष्पा नवले, श्रीमती शीतल बोरसे, श्रीमती दीपा रयबोले, श्रीमती ज्योती भागवत  यांनी सहकार्य केले तसेच सदरील कार्यक्रमासाठी एच ए आर सी संस्थेचे डॉक्टर पवन चांडक आणि प्राध्यापक शिवा आयथॉल यांचे सहकार्य लाभले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.