साप्ताहिक विशालक्रांती वर्धापनदिन निमित्त पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न!
अमर माने मलिकवाड - साप्ताहिक विशालक्रांती व विशालक्रांती न्युज चॅनेलच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना मानाचा फेटा, शिल्ड,व सन्मान पत्र देवून सन्मान करण्यात आला.
सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम मा. विजयानंद माने (पत्रकार) यांच्या अध्यक्षतेखाली वरदविनायक मंगलकार्यालय संगमनगर, तारदाळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी पुरस्कारासाठी निवड झालेल्या मान्यवरांचा उपस्थित खोतवाडीचे सरपंच, उपसरपंच,तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला "आद्य पत्रकार- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर" यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष- मा. विजयानंद माने यड्राव; राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष- सुरेश केसरकर, कोल्हापूर, डॉ. शिवाजीराव शिंदे, सेलू- परभणी; यांनी आपल्या मनोगताद्वारे विशालक्रांतीचे संपादक- आप्पासाहेब भोसले यांच्या कार्याचे कौतुक करुन सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांना शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी कवी साताप्पा सुतार, पुष्पनगर- गारगोटी व कवी सरकार, इंगळी यांनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी खोतवाडीचे सरपंच- विशाल कुंभार, उपसरपंच गजानन नलगे, व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष- प्रमोद माने; सा.विशालक्रांती चे उपसंपादक संजय पाटील, रविंद्र कांबळे संपादक सा.इंडीयाचा आवाज, सेवानिवृत्त पोलिस सब इन्स्पेक्टर- अशोक रुईकर (कोल्हापूर); अॅडव्होकेट- कविता स्वामी (पुणे); डॉ. अभिषेक खराडे-पाटील (जालना); हैदरसाब इनामदार (मंगळवेढा); डॉ. शैलेंद्र लोहार (खोतवाडी); डॉ. बाळासाहेब कामान्ना (पट्टणकोडोली); राजगोंडा पाटील (टाकवडे); सुलोचना कराडकर (खोतवाडी); कस्तुरी कुरुंदवाडे (अ. लाट); संगिता घोरपडे (रुई); रिबिका घोसरवाडे व रुपा घोसरवाडे (इचलकरंजी); रेखा गायकवाड (जयसिंगपूर); दर्शन उपाध्ये (इंगळी); मनोज चौगुले (टाकवडे); अवधूत सुर्यवंशी यड्राव, पत्रकार- आण्णासाहेब कदम (सदलगा); युवा पत्रकार अमर माने मलिकवाड, पत्रकार तानाजी रोडे मांजरी, पत्रकार राजू मुंडे चिकोडी, पत्रकार शिवाजी एडवान मानकापूर, रमेशकुमार मिठारे (अकिवाट); प्रितम शिंत्रे (कोगनोळी) आदी प्रमुख मान्यवरांसह तारदाळ, खोतवाडी व इचलकरंजी सह महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतील व कर्नाटक सिमाभागातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय समाजकार्य करणारे मान्यवर व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या