डॉ.शिवाजी रामभाऊ शिंदे यांना दुसऱ्यांदा डॉक्टरेट पदवी ने सन्मानित.

सेलू तालूका प्रतिनिधी. 

पं. दीनदयाल उपाध्याय हिन्दी विद्यापीठ यांच्या वतीने  "विद्या वाचस्पति सारस्वत  सम्मान समारंभाचे भव्य आयोजन. 

सेलू : सेलू येथील  श्रीमती ल.ला.रा.नूतन कन्या प्रशालेचे  सेवानिवृत्त आदर्श ग्रंथपाल  डॉ.शिवाजी रामभाऊ शिंदे यांनी कोरोना काळात सर्व शाळा,महाविद्यालये बंद होती.अशातच शासनाने ऑनलाईन शाळा सुरु करून विद्यार्थी वर्गाचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उपाय करीत ऑनलाईन शाळा महाविद्यालय सुरु केल्या.यानंतर देश विदेशातील नामवंत विद्यापीठानी वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ऑनलाईन वेबिनार चे आयोजन करून सर्व ग्रंथपालांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.याच संधीचा फायदा घेत सेलूच्या नूतन कन्या प्रशालेच्या स्व.सौ.दुर्गाताई द.कुलकर्णी स्मृति ग्रंथालयाचे ग्रंथपाल शिवाजी शिंदे यांनी सहभाग घेऊन आपले ग्रंथालय जगातील 108 विद्यापीठाशी जोडून विवीध उपक्रमांची माहिती सादर केली.वाचन संस्कृती वाढावी म्हणून काय काय उपाययोजना करता येतील,ग्रंथालया समोर काय काय आवाहने आहेत त्यावर काय उपाययोजना करता येतील यावर परखडपणे आपले मत मांडले.विविध वर्तमान पत्रातून "वाचल तर वाचल" या सदराखाली अनेक लेख प्रकाशित करून विद्यार्थी, शिक्षक,पालक यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचे कार्य केले.ग्रंथ संवर्धनासाठी  सेलू शहरासह अनेक वाचणप्रेमी दानशूर व्यक्तींना भेटून त्यांच्या कडून देणगी जमा करून विध्यार्थ्यांना नामवंत साहित्यकांचे ग्रंथ उपलब्ध करून देण्याचे निश्वार्थपणे कार्य केले.याच कार्याची दखल घेत त्याना 02 ऑक्टोबर 2022 मध्ये महात्मा गांधी जयंती निमित्ताने इंडियन एम्पायर युनिव्हर्सिटी ऑफ चैन्न्ई  ने पहिल्यांदा दखल घेत "डॉक्टरेट " या पदवीने सन्मानित करण्यात आले.याचं कार्याची दखल घेत आज पुनः एकदा पं.दिनदयाल  उपाध्याय हिंदी विद्यापीठ वृंदावन  मथुरा च्या वतीने दुसऱ्यांदा "विद्या वाचस्पति सारस्वत सम्मान" या पदवीने सम्मानित करण्यात आले. भोपाळ येथील पंच तारांकित हॉटेल रेडिसन मध्ये पं. दीनदयाल उपाध्याय हिन्दी विद्यापीठ वृन्दावन मथुरा यांच्या वतीने  राष्ट्रीय हिन्दी संगोष्ठी तथा विद्या वाचस्पति सारस्वत सम्मान समारंभाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
हिन्दी भाषा ला राष्ट्रभाषाची मान्यता देण्यासाठी सतत प्रयत्न करण्याचे कार्य सातत्याने या विद्यापीठाच्या माध्यमातून केले जाते.देशातील नव्हे तर अंतररार्ष्ट्रीय स्तरावरील अव्वल स्थानी असलेले   पं. दीनदयाल उपाध्याय हिन्दी विद्यापीठ , वृन्दावन धाम, मथुरा यांच्या वतीने 24 एप्रिल रोजी भोपाल मध्ये आयोजित भव्य सम्मान समारंभात देशातील विविध राज्यातील वेगवेगळ्या    क्षेत्रातील ज्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे अश्या व्यक्तींना "विद्या वाचस्पति" सारस्वत सन्मानाने सम्मानित करण्यात आले. 
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मध्य प्रदेश शासनाचे सेवानिवृत्त  न्यायाधीश देवेन्द्र कुमार जैन, अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इन्दु भूषण मिश्रा "देवेन्दु" तथा विशिष्ट अतिथि माध्य.  शिक्षण विभाग, लोक शिक्षण संचालनालय, मध्य प्रदेश शासनाचे  सेवानिवृत्त अप्पर अधिकारी  पं. धीरेन्द्र चतुर्वेदी तथा मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री उदय योजना शिक्षण विभागाचे प्रदेश प्रभारी मा. विष्णुकांत कनकने, राष्ट्रीय पर्यावरण तथा विद्यापीठाचे ब्रांड एम्बेसडर डॉ. विश्वनाथ पाणिग्रहिजी,वृंदावन येथील सुप्रसिद्ध  भागवत कथा वाचक मा.सुश्री दीपा मिश्रा जी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. डॉ.शिवाजी रामभाऊ शिंदे यांना दुसऱ्यांदा "डॉक्टरेट" या पदवीने सन्मानित केल्या बद्धल    संस्थेचे माजी सचिव आदरणीय प्राचार्य द.रा.कुलकर्णी, प्रशालेचे शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती,कार्यकारणी सदस्य  दत्तरावजी पावडे नाना,माजी प्रचार्य डॉ.शरद कुलकर्णी, परभणी जिल्ह्याचे खासदार संजय (बंडू) जाधव,  यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.मुकेश हरिभाऊकाका बोराडे, साईबाबा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष हेमंतरावजी आढळकर,सेलू नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष  विनोदरावजी बोराडे,माजी आमदार  विजयरावजी भांबळे,माजी  जि. प. बांधकाम सभापती अशोकनाना काकडे, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.संजयजी रोडगे,  सेलू तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती प्रकाश प्मुळे, मा.
नगरसेवक मनीष कदम,रघुनाथ बागल, माझे जन्मगावं निपाणी टाकळी चे सरपंच सुनील सावंत,आणि मित्र परिवार आदीने अभिनंदन केले.या पुरस्कारामुळे सेलू शहरासह  जिल्हाचे नाव लौकिक झाल्याचे समाधान  अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.