काँग्रेस पक्षाच्या विकास कामांच्या जोरावर आणि जनतेच्या विश्वासावर कुमारी प्रियांका जारकीहोळी दिल्लीला नक्की जाईल. -- प्रकाश हुक्केरी

सदलगा - प्रतिनिधी -- लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार कुमारी प्रियांका सतीश जारकिहोळी यांची सदलगा शहरातील मुख्य कार्यकर्त्यांची प्रचार सभा विद्यमान विधानपरिषद सदस्य व कर्नाटक सरकारचे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी मा. प्रकाश हुक्केरी यांच्या नेतृत्वाखाली सदलगा शहरातील कुंद कुंद प्रशालेतील सभाभवनात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आज संपन्न झाली.
चिकोडी लोकसभा मतदार क्षेत्रातील काँग्रेस पक्षाच्या विकास कामांच्या जोरावर आणि जनतेच्या विश्वासावर काँग्रेसची अधिकृत उमेदवार कुमारी प्रियांका जारकीहोळी दिल्लीला नक्की जाईल.
-- विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी.

आज सदलगा शहरातील कुमारी प्रियंका सतीश जारकीहोळी यांची प्रचार सभा संपन्न झाली .त्यावेळी माननीय प्रकाश हुक्केरी यांनी विकास कामांचा आढावा घेऊन काँग्रेस पक्षाच्यावतीने आतापर्यंत चिकोडी लोकसभा क्षेत्रात केलेल्या विकास कार्याचे त्यांनी कौतुक केले.
प्रारंभी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री अरुण देसाई यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाला सुरुवात केली. 
त्यानंतर इतर कार्यकर्त्यांमध्ये माजी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले, पिरगौडा पाटील, अझरुद्दीन शेखजी, बाळासाहेब पाटील, श्रीमती शमशाद जमादार, श्रीमती कौशल जमादार यांची मनोगते व्यक्त करण्यात आली. वरील वक्त्यांनी काँग्रेस पक्षालाच मते का द्यावीत याचा आढावा घेतला व केलेल्या विकास कामांची माहिती उपस्थित सभे समोर मांडली.
या प्रचार सभेसाठी नगरसेवक सतीश पाटील, आताऊल्ला मुजावर, भीमा माळगे, रवी गोसावी, प्रकाश अनुरे, रिहाना सनदी, शकुंतला कुंभार, इतर कार्यकर्ते रणजीत पाटील संजीव कोरे, संतोष नवले, महावीर उदगावे, सुनील पाटील, चांदसाब सनदी, रमजान गवंडी, महादेव मधाळे इत्यादी कार्यकर्त्यांसह सदलगा, बहिनाकवाडी ,वडगोल परिसरातील शेकडो स्त्री पुरुष या प्रचार सेभेसाठी उपस्थित होते.
सदलगा शहर प्रतिनिधी,
अण्णासाहेब कदम.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.