उदगांवात गुढी पाडव्याच्या निमित्ताने सासणकाठ्या उभारल्या
श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा आली आहे. या पार्श्वभुमीवर सालाबादप्रमाणे गुढी पाडव्याच्या निमित्ताने श्री जोतिबा देवाच्या दोन सासनकाठ्या उदगांव येथे विविध धार्मिक पुजा करून उभ्या करण्यात आल्या. पहाटेपासून हलगीचा कडकडाट आणि जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात विविध धार्मिक विधी करण्यात आले.
उदगांव येथे शिंदे बंधू व माने बंधू अशा 2 सासनकाठ्या आहेत. पहाटे दोन्ही सासनकाठ्या उदगांव येथील कृष्णा नदीत अभिषेक करून धुवून त्या विविध रंगाच्या कापडानी व झेंडानी सजवून फुलाचे हार घालून कृष्णा नदीकाठावरून गावात आणण्यात आले. सकाळी दहाच्या सुमारास येथील श्री महादेवीच्या मंदिरासमोर आल्यानंतर दोन्ही सासनकाठ्या उभ्या करण्यात आल्या. यावेळी हलगीच्या कडकडाट करीत मोठ्या उत्साहाने दोन्ही सासनकाठ्या अनेक भाविकांनी नाचविल्या. जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात गुलालाची उढळण करण्यात आली.
यावेळी शिलकुमार शिंदे, अमित शिंदे, सागर खुडे, अमोल कदम, मंगेश घाटगे, सुहाश शिंदे, मंदार माने, सागर माने यांच्यासह भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या सासनकाठ्या जोतिबा यात्रेला मोठ्या उत्साहात रवाना होणार आहेत.
टिप्पण्या