मराठ्यांनो, राजकारण्यांच्या नादी लागू नकामनोज जरांगे पाटील यांचे आवाहन.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

 गौरला संवाद सभा
परभणी : दि. 
21 मराठ्यांनो राजकारणाच्या नादाला लागून आपल्या जीवनाचे वाटोळे करुन घेवू नका, असे आवाहन संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी केले.पूर्णा तालुक्या तील गौर या ठिकाणी आयोजित केलेल्या संवाद बैठकीप्रसंगी ते बोलत होते. जरांगे यांनी यावेळी आपल्या भाषणातून हजार, दोन हजारांसाठी या निवडणूकीत कोणाच्या ही नादी लागू नका, राजकारणाच्या नादी लागून स्वतःचे वाटोळे करुन घेवू नका, असे आवाहनही केले. मराठा आरक्षणा साठीच्या संघर्षास मराठ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद ऐतिहासिक राहिला. मराठा समाज त्यातून एक झाला, ती एकजूट आता महत्वाची आहे. आरक्षणासाठी सगे सोयर्‍याच्या अधिसूचनेची अंमलबजावनी करण्याकरीता निर्णायक लढाईची गरज आहे. तो लढा आपण सर्वजण एकमुखाने लढू, आपल्याविरुध्द अनेक षडयंत्र झाले. परंतु, आपण ते हाणून पाडले. आपण कधीही मागे हटलो नाही. मरेपर्यंत हटणारही नाही, असेही ते म्हणाले. 8 जून रोजी बीड जिल्ह्यातील नारायण गढ या ठिकाणी सभा होणार आहे. त्यासाठी 900 एक्कर जमीनीवर सभेच्या दृष्टीने सर्वतोपरी नियोजन केले जाणार आहेत. मराठा बांधवांची ही सभा रेकॉर्डब्रेक व ऐतिहासिक व्हावी या दृष्टीकोनातून सर्व प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे मराठा बांधवांनी सतर्क रहावे, जागरुक रहावे, सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणीही शांत बसू नये, असे आवाहनही जरांगे यांनी केले.दरम्यान,सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने जरांगे यांचे पूर्णा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले. पूर्णा टी पॉइंट, देवगाव फाटा, एरंडेश्‍वर, कात्नेश्‍वर, माटेगाव तसेच नांदेड रस्त्या वरील चुडावा भागातही त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले. एक मराठा लाख मराठा या घोषणांनी संवाद सभास्थान व स्वागत स्थान दुमदुमले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.