आमदार सौ .मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती कापूस यार्डातील बीट पूर्वत सुरू.
शिवाजी शिंदे
सेलू : दि.2 एप्रिल रोजी सेलू जिंतूर विधानसभेच्या आमदार सौ.मेघना दीदी बोर्डीकर यांच्या प्रर्यत्नातून सेलू बाजार समिती कापूस यार्डातील बिट पूर्ववत सुरु झाले.गेल्या अनेक दिवसांपासून येथील कापूस यार्ड मधील कापूस खरेदी अंतर्गत वादामुळे बंद होती. अनेक बैठका होऊन ही अपेक्षित असे यश कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळाले नाही.त्यामुळे आमदार सौ.मेघना बोर्डीकर यांनी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून बैठक घडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष तसेच संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू ऍडव्होकेट दत्तराव नारायणराव कदम डॉक्टर संजय दादा रोडगे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू यांनी विशेष प्रयत्न केले यावेळी त्यांचे व्यापारी असोसिएशनने कौतुकही केले.शेतकरी बांधवांचे हित हे सर्वप्रथम असुन शेतकऱ्यांच्या माल आणि व्यावहारमुळे बाजार समिति आणि व्यापार चालतो त्यामुळे त्यांना प्राधान्य दिले पाहिजे असे मत आमदार साहेबांनी व्यक्त केले.
गेल्या पंचवीस दिवसापासून कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू कापूस यार्डातील बीट हे बंद होते. दरम्यानच्या काळामध्ये मासिक सभेत सभापती व व्यापारी संचालक यांच्यातील मारहाण,तसेच व्यापारी संचालकांना चोर आहेत. असे अपशब्द वापरले गेले यामुळे व्यापारी असोसिएशनने जोपर्यंत संबंधित संचालक माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही कापूस यार्डतील बीटा वर बहिष्कार टाकतो असे पत्र दिले. तेव्हापासून आजपर्यंत बऱ्याच बैठका झाल्या,बऱ्याच चर्चा झाल्या,पण विश्वासहार्यतेच्या अभावा मुळे पर्याय निघाला नाही. सेलू तालुक्यातील शेतकरी वर्गाची होणारी हेळसांड,तसेच व्यापारी वर्गात पसरलेली नाराजी आणि भीती दूर करण्यासाठी व सेलुतिल बाजारपेठ आणि व्यापार सुरुलित करण्याच्या हेतुने तालुक्याच्या आमदार सौ मेघना दीदी यांनी मध्यस्थी करत सन्मान जनक पर्याय काढला. तसेच एकेकाळी सेलू बाजारपेठ कापसा साठी प्रसिद्ध असून आपल्या शहरातील कापूस व्यापार हा वाढला पाहिजे,तसेच शेतकरी, व्यापारी आणि बाजार समिति मधे तनाव न होता समन्वय वाढला पाहिजे असे मत व्यक्त केले .सेलू ही कापसाची मुख्य बाजारपेठ असून येथे मराठवाड्याच्या सर्व दूर भागातून कापूस विक्रीसाठी येत असतो हे वैभव दरम्यानच्या वादामुळे लोप पावत होते. याची दखल घेत आमदार मेघना दीदी यांनी पुढाकार घेऊन व्यापारी यांची बैठक घेऊन अडचणी विचारल्या त्यांना विश्वास दिला व सन्मान जनक पर्याय काढला. यावर व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य व तसेच सेलू इंडस्ट्रियल ओनर्स असोसिएशन चे पदाधिकारी व सदस्य यांनी सकारात्मक होकार दर्शवला व उद्यापासून दी. 3 मार्च पासून बीट पूर्ववत सुरू करण्यास होकार दिला. बैठकीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माऊली ताठे,अनिलराव पवार, अजय भैय्या डासाळकर, केशवराव सोळुंके, भास्कर आबा पडघन ,रामेश्वरजी राठी, शैलेजी तोष्णीवाल उपस्थित होते.या बैठकीसाठी व्यापारी असोसिएशन चे प्रभूदयालजी मंत्री,सुरेंद्रजी,निर्मल भाई, आशिष विनायके,अविनाश बिहानी, ब्रिज गोपालजी काबरा,नारायणजी शर्मा, नबारामजी पवार, अमोलजी दायमा उपस्थित होते. तसेच सहाय्यक निबंधक तायडे साहेब, राठोड साहेब,आणि मार्केट कमिटी सचिव राजीव वाघ हे देखील बाजार समिति बैठक मध्ये उपस्थित होते.
टिप्पण्या