खासदार संजय (बंडू) जाधव यांच्या प्रचारार्थ सेलू शहरात महाविकास आघाडीची रॅली.
शिवाजी शिंदे
सेलू : सेलू शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांचा आशीर्वाद घेऊन महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार खा.संजय जाधव साहेब यांच्या प्रचारार्थ सेलू शहरात निघाले ल्या पदयात्रेत नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी नागरिकांनी त्यांचे स्वागत करत विजया साठी शुभेच्छा दिल्या. तसेच आठवडी बाजार येथे सय्यद शहाबुद्दीन अवलिया यांच्या समाधीवर चादर चढवून आशीर्वाद घेतला. तसेच मा.आ.विजयराव भांबळे साहेब यांनी नागरिकांना आवाहन करत येत्या 26 तारखेला मशाल या चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले.आपले कार्य हीच आपल्या लोकप्रियतेची पावती असते. मा.खा.संजय जाधव साहेब हे कर्तृत्ववान आणि निष्ठावान खासदार आहेत. जनता जनार्दन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. सर्वजण आपल्या पाठीशी उभे आहेत. विजयाची आपल्याला कसलीही काळजी नाही. प्रत्यक्ष 'विजयच' आपल्या सोबत उभा आहे. विजयराव भांबळे साहेबांच्या नेतृत्वात जिंतूर व सेलू विधानसभा मतदार संघातून तसेच सेलू शहरातून मताधिक्य आपणास देऊ. आपला मोठा विजय होईल," असा विश्वास यावेळी सेलू शहरातील नागरिकांनी व्यक्त केला.यावेळी साईबाबा नागरी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आढळकर,माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव काकडे,राजेंद्र लहाने,विनोद तरटे,इरफान जमीनदार ,सुधाकर रोकडे,मुक्तार खान,इमत्याज खान,मनीष कदम,शेख दिलावर,मिलिंद पवार, रघुतम नाना बागल, विशाल देशमुख, संजय साडेगावकर,मिलिंद सावंत,मज्जीद बागवान,शेख समीर,गौस लाला, परवेज आदी आघाडीचे नेते उपस्थित होते.
टिप्पण्या