चौदाशे गावापैकी एक हजार गावामध्ये मला लीड मिळणार आहे- संजय (बंडू) जाधव.
शिवाजी शिंदे
परभणी : परभणी लोकसभा मतदार संघांमध्ये चौदाशे गावे आहेत. या चौदाशे गावांपैकी एक हजार गावांमध्ये मला लीड मिळणार आहे. हे मी अत्यंत विश्वासाने सांगतो. मला जर या एक हजार गावातून लीड मिळाले नाही तर मी खासदार म्हणून निवडून आल्यानंतरही खासदारकी सोडेल. मतदारसंघातील महानगरपालिका आणि नगरपालिकां मध्ये मला लीड मिळेल. घनसांगवी मतदारसंघातून पन्नास हजाराची लीड तर परभणी मतदार संघातून एक लाखाच्या वर मतदार मला लीड देतील, असा विश्वास आहे. त्यामुळे २०२४ ची लोकसभा निवडणूक मी एकतर्फी जिंकणार आहे, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी व्यक्त केला.
परभणीतील अक्षदा मंगल कार्यालयात परभणी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी नागरिक डॉक्टर यांच्याशी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर खासदार फौजिया खान, आमदार डॉक्टर राहुल पाटील, विजय गव्हाणे, विवेक नावंदर यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या