तीव्र उन्हाळ्यात सावली देणारी विश्रामस्थळे म्हणजे ग्रंथ - सुरेश हिवाळे

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

सेलू : दि.22 फेब्रु.
"पुस्तके माणसाचे विचार प्रगल्भ करतात.विचारांच्या कक्षा रुंदावतात.सौंदर्याची सृष्टी आणि विचारांची दृष्टी देतात.ग्रंथ हे तीव्र उन्हाळ्यात सावली देणारी विश्रामस्थळे आहेत.म्हणून विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांनी ग्रंथास आपले सोबत करावयास हवे.असे प्रतिपादन सुरेश हिवाळे यांनी केले.
श्रीमती ल.ला.रा.नूतन कन्या प्रशाला, सेलू येथे क्रान्तीसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित "वाचन प्रकल्प आठवडा"
समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सुरेश हिवाळे बोलत होते.
व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी, प्र.अतिथी सुरेश हिवाळे , मुख्याध्यापिका उज्ज्वला लड्डा, डॉ बाबासाहेब थोरे, डॉ यशवंत कुलकर्णी, सुरेखाआगळे,भालचंद्र गांजापूरकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात क्रान्तीसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजनाने झाली.याप्रसंगी स्वरा देशपांडे आणि समीक्षा कुलकर्णी या विद्यार्थ्यांनीनी "वाचन प्रकल्प आठवडा अंतर्गत वाचन केलेल्या पुस्तकाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. विविध समाजसुधारक, विचारवंत, स्वातंत्र्य सैनिक,लेखक,कवी,
यांच्या पुस्तकांचा विद्यार्थीनीनी सात दिवस आस्वाद घेतला.समारोप प्रसंगी विद्यार्थीनींच्या भावना बोलक्या होत्या.
अध्यक्षीय समारोपात डॉ.शरद कुलकर्णी म्हणाले की, वाचन चळवळ व्हायला हवी.ती रुजायला हवी.वाचन हा छंद व्हायला हवा.वाचन जीवनाचा अविभाज्य भाग व्हायला हवा कारण वाचाल तर वाचाल.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किर्ती राऊत यांनी केले तर आभार डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी मानले.कार्यक्रमासाठी प्रशालेतील शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थीनी यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.