जयसिंगपूर येथे सत्यजित पाटील-सरूडकरयांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटनसरूडकर यांची मशाल घराघरात पोहोचवा : गणपतराव पाटील
हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरूडकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जयसिंगपूर येथे गुरूवारी झाले. दत्त शेतकरी सह. साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील व माजी आ. उल्हास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन झाले. स्वागत अमरसिंह निकम यांनी तर प्रास्ताविक माजी नगरसेवक अशोकराव कोळेकर यांनी केले.
गणपतराव पाटील म्हणाले, जयसिंगपूर शहर परिसरात कॉंग्रेस भक्कमपणे उभी आहे. कॉंग्रेसने नेहमीच पुरोगामी विचार जोपासला आहे. स्व. डॉ. सा. रे. पाटील यांनी जयसिंगपूरात कॉंग्रेसला चांगले वातावरण निर्माण करून दिले. त्यामुळे आजही या ठिकाणी कॉंग्रेसला अनुकूल वातावरण निर्मिती दिसून येते. कॉंग्रेसने समन्वयातून तोडगा काढला आहे. आजपर्यंतच्या निवडणुका कॉंग्रेसने मित्र पक्षाला सोबत घेवून लढवून जिंकल्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरूडकर यांना भरघोस मताधिक्य मिळण्यासाठी घराघरात मशाल पोहोचविण्याचे काम जोमाने करावे असे आवाहनही गणपतराव पाटील यांनी केले.
याप्रसंगी माजी आ. उल्हास पाटील, रमेश शिंदे, सुदर्शन कदम, युनूस बागवान, राजू चुडाप्पा, मंगलताई चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिरोळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष सर्जेराव शिंदे, अनंत धनवडे, माजी नगराध्यक्ष सुभाष भोजणे, माजी नगराध्यक्षा अनिता कोळेकर, बंडा मिणीयार, इलाई बाणदार, माजी नगरसेवक युनूस डांगे, मुसा डांगे, संजय पाटील-कोथळीकर, नितीन बागे, प्रकाश दाईंगडे, रणजितसिंह पाटील, हसन देसाई, चंद्रकांत निशाणदार, मुसा काझी, विरेंद्रसिंह निकम, दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे, दिलीप पाटील-कोथळीकर, संजय चौगुले, मियालाल शेख, राजू स्वामी, राजू कोळेकर, राजू हरळीकर, मधुकर माळी, सुभाष खैरे, स्वप्निल कांबळे, संदीप पोपळकर, चंगेजखान पठाण, वैभव उगळे, मधुकर पाटील, साजिदा घोरी, बी. जी. माने, आदम मुजावर, युनूस बागवान, रघुनाथ देशिंगे, महादेव राजमाने, पराग पाटील, जुबेर शेख, मधुकर ढाले, दिलीप तुपे, प्रकाश देसाई, कैलास काळे, श्रीपती सावंत, राजेश सानिकोप, अनिल माने, ऍड. संभाजीराव जाधव, तानाजीराव जाधव यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते. तेजस कुर्हाडे यांनी आभार मानले.
टिप्पण्या