रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय प्रास्तावित मार्गासाठी सुरू असलेले मोजणीचे काम राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्यासह शेतकर्यांनी काम बंद पाडले
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गातील चोकाक ते उदगांव मार्गात बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास चोकाक (ता.हातकणंगले) येथे प्रास्तावित मार्गासाठी सुरू असलेले मोजणीचे काम राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्यासह शेतकर्यांनी काम बंद पाडले. दरम्यान शेतकर्यांनी तात्काळ प्राधिकरण कार्यालयात धाव घेवून अधिकार्यांना जाब विचारला. अखेर शेतकर्यांची चर्चा केल्याशिवाय कोणतेही काम सुरु करणार नसल्याचे अश्वासन प्राधिकरणचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी शेतकर्यांना दिले.
याबाबत अधिक माहिती अशी, होणार्या रत्नागिरी नागपूर महामार्गातील चोकाक ते उदगांवपर्यच्या गावातील शेतकर्यांच्या त्रुटी व चौपट भरपाईची मागणी आहे. तसेच उदगांव ते जैनापूर पर्यत जुन्या बायपास मार्गावरून मार्ग निश्चित झालेला नाही. शिवाय हरकतीवर झालेल्या सुनावणीवर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे काही दिवसापासून उदगांव, जैनापूर, निमशिरगांव, तमदलगे, चोकाक परीसरात जमीनी हस्तांतर होण्यापुर्वीच मार्किंग करुन हद्दीचे दगड लावण्यात आले आहेत.
बुधवारी चोकाक येथे हातकणंलगे भुमि अभिलेख कार्यालयाचे राहुल पाटील यांच्यासह कर्मचार्याकडून मोजणी करण्यात येत होती. त्यानंतर चोकाक येथील शेतकरी एकत्रित येवून राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्या माध्यामातून या मोजणीचे काम बंद पाडले. त्यांनतर कोल्हापूर उजळाईवाडी येथील राष्ट्रीय प्राधिकरण कार्यालयात धाव घेतली.
यावेळी प्राधिकरणचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी पंदरकर म्हणाले, मोजणी होणारच आहे. मोजणी थांबविल्यास शासकीस कामात अडथळा आणल्याप्रकरणी आपल्यावर कारवाई करण्यात येईल. चौपट मोबदल्याचा विषय हा मंत्री मंडळस्तरावरील आहे. तो तुम्ही मंत्र्याच्या पातळीवरूच सोडवावा. तसेच शेतकर्यांचा निर्णय सांगा तोपर्यत आम्ही थांबतो असे त्यांनी सांगितले.
यावेळी युवराज नंदिवाले, संतोष सुतार, कमलेश पटेल, अजित सागांवे, दिपक सुतार, आनंद पाटील, संजय सुर्यवंशी, सन्मती पाटील, बाजीराव लोहार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
टिप्पण्या