नवीन कार्यकर्त्यांच्या आगमनाने भाजपा पक्षाला आणखी बळ.
चिक्कोडी प्रतिनिधी - राजु मुंडे.
भाजपचे सिद्धांत “सेवा हेच संघटना” व देशाचे अभिमानी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांचे “सब का सात सब का विकास” या सिद्धांतावर विश्वास ठेऊन आणि खासदार श्री अण्णासाहेब जोल्ले यांनी केलेल्या विकास कामांनी प्रभावित होऊन चंदूर गावातील श्री बाळु पाटील, श्री अशितोष पाटील, श्री किसन बोळे, श्री महेश चौगले, श्री आकाश पाटील, श्री कृष्णात कणीरे, श्री रवि घाटगे, श्री शिवानंद पाटील, श्री अशोक पाटील, श्री गोंदा पाटील, श्री दादा मधबावे, श्री अशोक समाजे, श्री अनिल माने आणि त्यांच्या टीममधील सदस्यांनी काँग्रेस पक्ष सोडून आमच्या भाजपा पक्षात प्रवेश केले. त्या कार्यकर्त्यांचे *माजी मंत्री आणि निपाणी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सौ. शशिकला जोल्ले जी* आणि *चिक्कोडी लोकसभेचे खासदार माननीय श्री अण्णासाहेब जोल्ले,जी* यांनी भाजपा पक्षात स्वागत केले.
वार्तादार राजू मुंडे चिकोडी.
टिप्पण्या