शिरटीचे ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिर कलशारोहण व वास्तुशांती सोहळा उत्साहात संपन्न प्रमुख सात कलशासह 49 कलशाची विधिवत स्थापना हजारो भाविकांनी घेतले दर्शन
शिरोळ / प्रतिनिधी : शिरटी (ता शिरोळ) येथील जागृत ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिराच्या कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्याच्या तिसऱ्या तथा मुख्य दिवशी शुक्रवारी विविध धार्मिक कार्यक्रम कलश पूजन होमहवन कलशारोहण सोहळा महाप्रसादाचे वाटप हास्य गंध हा करमुनिकेच्या कार्यक्रमाबरोबरच विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले मंदिरात दिवसभर भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती या धार्मिक सोहळ्यामुळे गावात चैतन्यदायी व भक्तिमय वातावरणात निर्माण झाले होते.
येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सर्वांच्या सहकार्याने करण्यात आला आहे श्री भैरेश्वर देवालयाचे काम पूर्णत्वास आले आहे यामुळे या मंदिराचा कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्यास बुधवारपासून श्रीक्षेत्र आडी येथील श्री दत्त देवस्थान मठाचे प्रमुख परमाब्धिकार प पू परमात्मा महाराजांच्या दिव्य सानिध्यात मांगुरचे शाम भटजी यांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा अमाप उत्साहात चैतन्यदायी व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या धार्मिक सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला कलशारोहणाचा मुख्य दिवस असल्यामुळे पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती दिवसभर मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते
कलशारोहण सोहळ्यासाठी श्री क्षेत्र आडी येथील दत्त देवस्थान मठाचे प्रमुख परमाब्धिकार प पू परमात्माराज महाराज यांचे शिरटी गावात आगमन होताच ग्रामस्थ भाविकांनी फुलांच्या पायघड्या घालून व पुष्पृष्टी करत हालगी तुतारीच्या निनादात जल्लोषात स्वागत केल त्यांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती
शुक्रवारी कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्याचा मुख्य दिवस यानिमित्ताने पहाटे साडेपाच वाजता श्री भैरेश्वरास अभिषेक घालण्यात आला गावातील प्रमुख मानकरी कलश सवालधारक विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व कलश पूजन व होमहावन झाले दुपारी एक वाजून बेचाळीस मिनिट या शुभ मुहूर्तावर कलशारोहण सोहळ्यास सुरुवात झाली प्रथम मुख्य गाभारा कलश स्थापना मुख्य शिखर कलश स्थापना मुख्य प्रवेशद्वार शिखरावरील धर्म कलश स्थापना मुख्य प्रवेशद्वार शिखरावरील रक्षा कलश स्थापना मुख्य प्रवेशद्वार शिखरावरील प्रीती कलश स्थापना मुख्य प्रवेशद्वार शिखरावरील बल कलश स्थापना मुख्य प्रवेशद्वार शिखरावरील यश कलश स्थापना प पू परमात्मराज महाराज आणि शाम भटजी कलश सवालधारक महादेव भंडारे अनिकेत मगदूम प्रशांत पाटील लक्ष्मण भंडारे नेमगोंडा पाटील राजकुमार शिरगावे कल्लाप्पा भंडारे यांच्यासह मंदिराचे पुजारी राजेंद्र गुरव सुरेश गुरव रवींद्र गुरव यांच्यासह गुरव बंधू गावातील मानकरी ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यानंतर अशोक सुतार सुशांत भंडारे गणेश भंडारे शितल चौगुले सुरेश भंडारे सुभाष भोसले सुशांत गंगधर शशिकांत भंडारे शशिकांत कांबळे तायाप्पा भंडारे विष्णु भंडारे बापूसो मगदूम कुमार भंडारे अनिल भंडारे प्रकाश बंडगर चंद्रकांत पवार सुशांत चौगुले राजाराम रोजे भगवान साळुंखे काशिनाथ माळी राहुल सूर्यवंशी रविराज पाटील पंकज हुपरे बाळासाहेब भंडारे आदित्य पाटील सचिन भंडारे संजय भंडारे संग्राम शिंदे उदगांवे परिवार जावेद खतीब अरुण भंडारे एकनाथ कुऱ्हाडे संजय भंडारे शामराव बन्ने धनाजी भंडारे सर्व मानकरी प्रतिनिधी पुजारी सतीश चौगुले अमोल सुतार भैरवनाथ भंडारे राजाराम चव्हाण या सवालधारकांच्या आणि मान्यवरांच्या आणि ग्रामस्थ भाविकांच्या उपस्थितीत मंदिरावरील विविध 42 कलशांची स्थापना करण्यात आली मंदिरात एकूण 49 कलशांची स्थापना विधिवत पूजन होम हवन करून करण्यात आली यावेळी भैरेश्वराच्या नावानं चांगभलं चा अखंड गजर करण्यात आला
सायंकाळी चल हवा येऊ द्या फेम वृषभ आकीवाटे त्यांचा हास्यगंध हा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी धनाजी भोसले मनोज चौगुले प्रमोद माळी श्रीपती कुंभार शामराव गंगधर श्रेणिक मगदूम राजगोंडा पाटील आप्पा भोसले यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी गावातील प्रमुख मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
हा धार्मिक सोहळा पार पाडण्यासाठी गेली महिनाभर श्री भैरेश्वर जीर्णोद्धार व कलशारोहण समिती श्री भैरेश्वर युवक यात्रा कमिटी ग्रामपंचायत शिरटी गावातील सर्व मानकरी समाजबांधव तरुण मंडळे विविध सहकारी सेवा संस्था पतसंस्था मंदिराचे पुजारी गुरव बंधू यांच्यासह ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले या धार्मिक सोहळ्यानिमित्त गावात गेली तीन दिवस सर्वत्रच भक्तिमय वातावरणाबरोबर चैतन्य निर्माण झाले होते .
टिप्पण्या