सौ शैलजा परमणे कोल्हापूर यांना राष्ट्रीय साई कलारत्न समाज भूषण पुरस्कार जाहीर .
शिर्डी येथील ओमसाई विकास प्रतिष्ठाण आणि बी .बी .सी . फिल्म प्रोडक्शन या संस्थेचा कोल्हापूर येथील कवियत्री सौ शैलजा मोहन परमणे कोल्हापूर यांना राष्ट्रीय स्तरांवरील साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे पुरस्कार वितरण सोहळा दिनांक ३/५/२४ रोजी सिद्ध संकल्प लॉन साकुरी शिर्डी अहमदनगर येथे संपन्न होणार आहे .
सौ शैलजा परमणे यांच्या काव्यक्षेत्रातीला व शिक्षण अध्यापन क्षेत्रातील योगदान कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावरील साई कलारत्न समाजभूषण हा पुरस्कार मान्यवरांचे हस्ते देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे
सदर पुरस्कार वितरण सोहळा ओम साई विकास प्रतिष्ठण व बी बी सी फिल्म प्रोडक्शन या संस्थेचे प्रमुख अध्यक्ष मान . श्री सुदाम संसारे सर यांनी व त्यांचे संस्थेचे पदाधिकारी यांनी आयोजन केले आहे . नुकताच त्यांनी सदर पुरस्काराचे निवडपत्र दिले आहे .
सौ शैलजा परमणे यांना निवड झालेल्या पुरस्कारासाठी साहित्य क्षेत्रात कौतुक होत आहे .
टिप्पण्या