जयसिंगपूर येथील शिरोळ बायपासवर चारचाकीची विद्युत डीपीला धडक
शिरोळ-चौंडेश्वरी बायपास मार्गावरील धरणगुत्ती हद्दीत भरधाव चारचाकी कार विद्युत खांबाला धडकली. सुदैवाने कोणतीही हानी झाली नसलीतरी वाहनाचे मोठे नुकसान झाले. प्रसंगावधान राखून कारचालक गाडीतून सुखरूप बाहेर पडला. या मार्गाचे रुंदीकरण झाल्यामुळे या मार्गावर वाहतुक वाढली आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या महावितरणच्या डीपीला जोराची धडक बसल्याने विद्युत खांबही वाकला आहे.
टिप्पण्या