उदगाव खुनप्रकरणी आणखी दोघांना अटक, तीन दिवस कोठडी

जयसिंगपूर : 
 उदगाव (ता. शिरोळ) येथे सचिन अज्ञान चव्हाण (वय २४, मुळ गाव रा.कुपवाड, जि.सांगली) याच्या खुनप्रकरणातील फरारी असलेल्या आणखी दोघांना जयसिंगपूर पोलिसांनी सांगली कोल्हापूर बायपास महामार्गावर उदगाव येथील हॉटेल सिग्नेचर जवळ अटक केली. अमित बाळू वाघमोडे (वय २६, रा.वाघमोडेनगर मिरज, जि.सांगली) व सोनल उर्फ तुषार साखळे (वय २९, रा.बामनोळी रोड कुपवाड) अशी संशयीतांची नावे आहेत. त्यांना रविवारी जयसिंगपूर येथील न्यायालयात उभे केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
उदगाव येथे सचिन चव्हाण याचा एडक्याने वार करुन खुन झाला होता. या खुनप्रकरणी यापुर्वी चौघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान या खुनप्रकरणातील मोटारसायकलीवरुन अन्य दोघे संशयीत फरारी झाले होते. याचा शोध जयसिंगपूर पोलिसांकडून सुरु होता. दरम्यान या संशयीतांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून त्यांना जयसिंगपूर न्यायालयात रविवारी उभे करण्यात आले. न्यायालयाने संशयीत आरोपींना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या खुनप्रकरणातील आतापर्यंत सहा आरोपींना अटक झाली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.