विश्वनाथ बन्ने यांचे शासकीय कार्य प्रेरणादायी ः आमदार सुधीर गाडगीळ.,सांगली येथे अमृतमहोत्सव सोहळा उत्साहात संपन्न
सर्वसमान्य माणूस केंद्रबिंदू मानून विश्वनाथ बन्ने यांनी 37वर्षे शासकीय सेवा बजाविली आहे. बन्ने यांचे कार्य आजच्या समाजाप्रती प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे, असे गौरवदगार सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले.
निवृत्त गटविकास अधिकारी विश्वनाथ बन्ने यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा सांगली विश्रामबाग येथील माहेश्वरी गार्डन येथे संपन्न झाला. यावेळी आमदार गाडगीळ बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रजज्वन करण्यात आले. आर्चना साळुखे यांनी स्वागत गीत म्हटले तर डॉ. निकिता पाटील प्रास्ताविक केले. विश्वनाथ बन्ने यांच्या जीवनकार्यावरील प्रशांत देसाई, हर्षल बागल लिखित देणार्याने देत जावे... या स्मणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, विश्वनाथ बन्ने यांनी प्रशासकीय सेवेत सर्वसामान्याची हित जोपासत कार्य केले. आजही सांगली कर्मभुमी असली तरी मातृभुमी शिरोळ या गावाशी त्यांची नाळ जोडली आहे. निवृत्तीनंतरचे जीवन त्यांनी कुटुंबाबरोबरच सामाजासाठी वेळ खर्ची द्यावा असे त्यांनी सांगितले.
यावेळी दलिममित्र डॉ.अशोकराव माने म्हणाले, शिरोळ मधील कै.स्वातंत्र्य सैनिक व पत्रकार के.बी.बन्ने यांचे प्रेरणा घेवून आम्ही सामजकार्य सुरू केले. त्यांचे चिंरजीव विश्वनाथ बन्ने यांनी बारामती, आजरा, गडग्हिंलज, चंदगड यासह अन्य ठिकाणी सेवा बजावित शिरोळचा नावलैवकीक वाढविला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिरोळ माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, सांगलीचे नगरसेवक लक्ष्मण नवलाई यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सत्कारांला उत्तर देताना विश्वनाथ बन्ने म्हणाले, माझ्या नोकरीची सुरूवात 1970 साली सांगली येथून झाली. बारामती, आजरा, चंदगड अशी प्रशासकीय सेवा बजावली. कटू प्रसंगाला सामोरे जात अनेकांची मने जिंकत प्राप्त परिस्थित समाधान मानले. मागील परीस्थिची जाणीव ठेवत आजपर्यतच्या प्रवास यशस्वी केला. आई वडीलांच्या संस्कारामुळे आम्ही घडलो आहे. यापुढेही समाजासाठी काय करता येईल ते करण्यासाठी मी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विश्वनाथ बन्ने पत्नी शालन बन्ने यांनी वाढदिवसाचा केक कापला मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी मनीषा राजमाने रमेश राजमाने दैनिक ललकारचे े संपादक सुभाष खराडे, पत्रकार हनमंत विभुते, सयाजी शिंदे, दत्तत्राय हजारे, विस्तार अधिकारी शशिकांत सावंत, सिध्दाप्पा आळगे, निलेश गुळवे, विकास पाटणकर, अमर जाधवराव, बाळासाहेब चौगुले, दत्तात्रय पडळकर, पांडूरंग राजमाने, सुहास राजमाने, रामचंद्र बन्ने, प्रकाश बन्ने, अजित औरवाडकर, मल्लाप्पा आळगे, सागर सारडा, महेश कराडकर, प्रशांत कुलकर्णी, आर.सी.हिरेमठ, किरण घोडके, विकास मोहिते, सचिन बावडेकर, धनाजी देसाई, शशिकांत मुसुटगे, संजय संकळे, शंकरराव पाटील, योगेश सोनलकर, अशोक परीट, बाळासाहेब पाटील, लक्ष्मण बन्ने, पांडूरंग शिंदे ्े, राकेश बन्ने यांच्यासह बारामती, आजरा, चंदगड, जयसिंगपूर, सांगली, शिरोळ यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिला. सुत्रसंचलन प्रियंका कार्लेकर आभार अजित भरमगुडे यांनी मानले.
टिप्पण्या