इंगळी येथील मनाला चटका लावणारा युवा उद्योजकांचा मृत्यू...
हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावचे सुपुत्र, गावातील प्रगतशील शेतकरी, उत्कृष्ट प्रामाणिक उद्योजक, इंगळी गावातील सर्वच लोकांच्या बरोबर मिळून मिसळून असणारे जैन समाजातील अत्यंत मनमिळाऊ व्यक्तिमत्व, सातत्याने जिव्हाळा, प्रेम, इतर संकटकाळी इतरांच्या कार्याला सदैव सहकार्य लाभलेले,
श्री शरद आणासो बुगटे यांचा मृत्यू म्हणजे मनाला चटका लावणारा मृत्यू झाला अजून वयाची पन्नाशी ओलांडली नाही अशा वयात त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे .
स्वःताच्या गावात शेती सांभाळीत त्यांनी परगावी ज्वेलर्सचे व्यवसाय करत होते आपल्या गावासह शिरोळ तालुक्यातील अनेक गांवना सोने चांदी व्यवसायाच्या माध्यमातून नाव कमावले होते नव उद्योजक म्हणून त्यांचा आदर्श घेण्यासाखा होता पण त्यांना वाटेतचं मृत्यूने गाठले . आपला व्यवसायाचे काम संपवून घरी येत असताना त्यांना मोटरसायकल चालवताना हार्ट अटॅक आलेने खाली पडलेने त्यांचा मृत्यू झाला .
शदर आणणासो बुगटे हे गावातील तरुण वर्गाला दिशा व मार्गदर्शन देणारे व्यक्तीमहत्व होते . त्यांच्या अचानक निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे .
टिप्पण्या