मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढला म्हणून विवंचेतून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

देऊळगाव गात येथील घटना.  


सेलू : सेलू तालुक्या तील देऊळगाव गात येथे दिनांक 29 जून 2024 रोजी दुपारी 11:30 ते 12:30 च्या सुमारास संदीप रोहिदास गायकवाड  वय 19 वर्ष राहणार देऊळगाव गात येथील तरुणाने आपल्या राहत्या घरी पत्राच्या लोखंडी पाईपला टॉवेलच्या साह्याने मराठा आरक्षणाचा सगे सोयरेचा  अध्यादेश न काढल्यामुळे व आरक्षण मिळत नसल्यामुळे मला नोकरी मिळेल का नाही या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली असून मयत तरुणाजवळ आरक्षण मिळत नसल्याची चिट्ठी  सापडली आहे.  सदरील तरुण हा जिंतूर येथील शासकीय पॉलिटे क्निक मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग च्या डिप्लोमा चे शिक्षण घेत होता. आत्महत्याची माहिती सेलू पोलीस स्टेशनला मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक दिपक बोरसे, पोलीस जमादार ज्ञानेश्वर जानकर, शिवदास सूर्यवंशी, मनोहर कोपनर आदींनी  घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. तसेच प्रेत देऊळगाव गात येथील  प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उत्तरीय तपासणी डॉक्टर अक्षय काळे यांनी प्रेत  नातेवाईकांच्या स्वाधीन केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार शिवदास सूर्यवंशी हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.