एसटी डेपो नांदेड आगाराचे दोन कर्मचारी सेवानिवृत्त; निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

नांदेड- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथील विविध पदावरील दोन कर्मचारी वयाचे ५८ वर्षे पूर्ण करुन प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल दि. ३० जून २०२४ रविवार रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता आगार कामगार कर्मचाऱ्यांच्यावतीने त्यांचा सपत्नीक हृदय सत्कार करुन शुभेच्छारुपी निरोप देण्यात आला. यामध्ये वाहतुक नियंत्रक गंगाधर विठ्ठलराव वाघमारे (३५ वर्षे सेवा),
चालक नंदीअप्पा देविदास मठपती (२० वर्षे सेवा) सेवा बजावणाऱ्या या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
सर्वप्रथम बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान यांच्या हस्ते दोन्ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सपत्नीक
पुष्पहाराने हृदय सत्कार करुन शुभेच्छारुपी निरोप देण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक विष्णू हारकळ, श्रीनिवास रेणके, कामगार नेते चंद्रकांत कदम, बसस्थानक प्रमुख यासीन हमीदखान, सहाय्यक वाहतुक निरीक्षक शेख मोबीन, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, वाहतुक नियंत्रक उदय पांडे, निर्दोष पवार, सारंग मठपती, सौ. सविता गंगाधर वाघमारे, आरती वाघमारे, बसवेश्वर वाघमारे, कर्मचारी योगीता सुवर्णकार, कल्पना मोरे, आशा वाघमारे, रत्नाकर दिवसे, प्रकाश वारकड, मंगेश झाडे, अतुल कांबळे, तिरुपती लुंगारे, संतोष देवकांबळे, विश्वास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी वरील सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन गोविंद तेलंग यांनी मांडले. या कार्यक्रमास रा.प. आगारातील कामगार कर्मचारी, नातेवाईक, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.