जयसिंगपूरमध्ये तेजा फोटोग्राफी फर्मचा उद्घाटन सोहळा उत्साहात
येथील सहाव्या गल्लीतील फॉर्च्यून प्लाझा येथे
विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मित्र परिवारांच्या उपस्थितीत तेजा फोटोग्राफी फर्मचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला . या फर्मचे प्रमुख तेजस भंडारे यांच्या मातोश्री सौ प्रभावती भंडारे व वडील अरुण भंडारे या दाम्पत्यांच्या हस्ते तेजा फोटोग्राफी फर्मचे उद्घाटन झाले .
यावेळी सिनेअभिनेते डॉ दगडू माने म्हणाले , युवा उद्योजक तेजस भंडारे यांचे फोटोग्राफी व्यवसायात चांगले कौशल्य आहे. उद्योग व्यवसायातील स्पर्धा व आव्हाने स्वीकारून अनेक तरुण उद्योजक स्वतः ची ओळख निर्माण करीत आहेत . अशाच पद्धतीने जयसिंगपूर परिसरात तेजा फोटोग्राफी फर्म ही नवी ओळख निर्माण करेल. माणसाच्या आयुष्याच्या फोटो आणि शूटिंग रूपाने प्रत्येक क्षणाच्या आठवणींचा एक अल्बम असतो . त्यामुळे आठवणीचा हा दस्तऐवज कौटुंबिक आणि मित्र परिवाराच्या नात्यामध्ये अधिक जिव्हाळा निर्माण करीत असतो. त्यामुळे युवा फोटोग्राफर तेजस भंडारे यांनी फोटोग्राफी - व्हिडिओग्राफी अशा नवनवीन साधनांच्या माध्यमातून चांगली ग्राहक सेवा करून व्यवसायात नावलौकिक मिळवावा अशा शुभेच्छा डॉ दगडू माने यांनी दिल्या.
यावेळी शिरोळ तालुका फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर्स संस्थेचे अध्यक्ष राजू सावंत , कोल्हापूर जिल्हा भटक्या विमुक्त जाती - जमाती विकास मंडळाचे सचिव संजीव नाईक , माजी नगरसेवक बजरंग खामकर , ज्येष्ठ पत्रकार व अभिनेते डॉ दगडू माने , चित्रपट निर्माते रामभाऊ लामदाडे , सैनिक वेल्फेअर असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष संजय माने , शिरोळ शहर माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष संजय इंगळे , दानवाड आश्रम शाळेचे मुख्याध्यापक अनिल पाटील , भरत निर्मळ , सुभाष माने ,स्वप्निल माने , स्नेहल निर्मळे , रामदास भंडारे ,
प्रल्हाद साळुंखे , श्री राजपूत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान या उद्घाटन सोहळ्यानंतर सामाजिक , सहकार , राजकिय व कलाक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन तेजा फोटोग्राफी फर्म ला शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या