मराठी चित्रपट खाकी ...लय भारी मध्ये अभिनेता राजू वावधने रुपेरी पडद्यावर झळकणार...
शेवगाव पांडुरंग गोरे - नागेश फिल्म प्रोडक्शन व आई जगदंबा भवानी फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खाकी ...लय भारी या मराठी चित्रपट मध्ये राजू वावधने पोलीस कॉन्स्टेबल च्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे, अभिनेता राजू वावधने यांनी कोवीड च्या काळामध्ये जनजागृती , समाजकार्य केले आहे, यांची दखल घेत, निवडीचे पत्र दिग्दर्शक पांडुरंग गोरे, कास्टिंग डायरेक्टर श्री उद्धव फंगाळ सर, यांनी त्यांना नुकतेच दिले आहे,
अभिनेता राजू वावधने यांनी आपल्या नावाशी संदर्भ राखणारा सच्चा प्रामाणिक हवालदार ...राजू शेट्टी पोलीस कॉन्स्टेबलची दमदार भूमिका, खाकी ..लय भारी या मराठी चित्रपटातील भूमिका देश भक्ती ची आहे, देशभक्ती वरती चित्रपट असल्यामुळे त्यांनी हा चित्रपट स्वीकारला नसून, दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचे चित्रपटाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानात दाखल होणार आहे, व देशाच्या गद्दारांना ठोकल्याशिवाय राहणार नाही , हि शपथ घेणार आहे, यासाठी आता अभिनेता राजू वावधने हे जीवाची परवा न करता जीवाची बाजी लावू , पुर्व परिश्रम घेऊन चित्रपट करू त्यांचे या भूमिकेबद्दल त्यांच्या निवडीबद्दल त्यांनी दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचे पुनश्चआभार मानले, मराठी फिल्म इंडस्ट्री मधून त्यांचे निवडीबद्दल स्वांगत व अभिनंदन होत आहे, या पोलीस कॉन्स्टेबल राजू शेट्टी या भूमिकेच्या निवडीबद्दल त्यांनी कास्टिंग डायरेक्टर संपादक साहेब, श्री उद्धव फंगाळ सर यांचे आभार मानले आहे , लवकरचं हा मराठी चित्रपट 15 ऑगस्ट पासून चित्रीकरण करण्यास प्रारंभ होणार आहे, अभिनेते राजू वावधने हे लाठी घेऊन आता चित्रपट क्षेत्राच्या मैदानात दाखल झाले आहे .
टिप्पण्या