डॅशिंगबाज पोलीस इन्स्पेक्टर दिलीप वनवे देशाच्या गद्दारांना ठोकणार ...
शेवगाव पांडुरंग गोरे - दुश्मन के लिए कोई जगां नही... देश के लिए जिंदगी कुर्बान है...दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचा आगामी मराठी चित्रपट बहुचर्चित खाकी.. लय भारी म्हणजेच देशाच्या दुश्मनासाठी लय.. डेंजर आहे , या मराठी चित्रपटाचा मुहूर्त, उद्घाटन 15 ऑगस्ट रोजी होणार आहे, सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत असलेली, खानदेश सॉंग स्टार, सिने अभिनेत्री ऋतुजा पाटील , बॉलीवूड स्टार चित्रा दीक्षित , अभिनेत्री प्रतीक्षा कुलथे, अभिनेत्री प्रचिती चांदणे, अभिनेत्री शिल्पा पवार या दिग्गज सेलिब्रिटीसह सर्वांच्या साक्षीने या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न होणार आहे, दिलीप वनवे यांनी, संपादक साहेब श्री उद्धव फंगाळ सर, चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग गोरे, पत्रकार संजय लहासे, यांचे आभार मानले आहे, या चित्रपटांमध्ये दिलीप वनवे हे डॅशिंगबाज इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे , जे देशासाठी आपल्या जीवाची परवा न करता, जीवाची बाजी लावून.. देशाच्या गद्दारांना ठोकण्यासाठी सज्ज झाले आहे, आपला पहिलाच मराठी चित्रपट आणि त्यामध्ये आपली जबरदस्त फर्स्ट एंट्री आहे, या चित्रपटात मध्ये ते एक स्वच्छ प्रतिमा असलेली, सचदेव वर्मा इमानदार , देशभक्त इन्स्पेक्टर पोलीस इन्स्पेक्टर ची भूमिका निभावत आहे, त्यांच्या निवडीबद्दल गांवकरी व मराठी फिल्म इंडस्ट्री मधून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे की, त्यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे, त्यांनी या अगोदर मराठी नाटक मध्ये विविध भूमिका केले आहे व मराठी चित्रपट खाकी...लय भारी यामध्ये प्रथमचं चित्रपटांमध्ये भूमिका करताना दिसणार आहे, अभिनेता दिलीप वनवे यांना खाकी लय भारी या मराठी चित्रपटासाठी खूप, खूप, हार्दिक शुभेच्छा.
टिप्पण्या