यड्राव येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या .
यड्राव (प्रतीनिधी ) येथील इंदिरानगर (बेघर वसाहत ) मधील एकाने रहात्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली . सचिन मल्लाप्पा वाघमारे (वय ३७ वर्षे ) असे त्याचे नाव आहे . सदर घटनेची भाऊ सागर वाघमारे यांने शहापूर पोलीस ठाणेत फिर्याद दिली . घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी , मयत सचिन वाघमारे हा इंदिरानगर (बेघर वसाहत ) येथे आपल्या कुटूंबासोबत रहात होता . पत्नी व मुले सुट्टीला गावी गेले होते . यातच मयत सचिन यांने अति मद्य प्राशन करून नशेत काल ( रविवार दि . ९ ) रोजी रात्री रहात्या घरी तुळीस ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली . सकाळी मयत सचिन याचा भाऊ सागर वाघमारे यांने अजून दरवाजा बंद असल्याचे पाहून त्यांने सचिन यास आवाज दिला पण आतून प्रतिसाद न मिळाल्याने सागर यांने दरवाजाच्या फटीतून पाहीले असता सदरची घटना निदर्शनास आली . घटनास्थळी शहापूर पोलीस व पोलीस पाटील जगदिश सपकाळ येऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटल येथे पाठविण्यात आला . मयत सचिन याच्या पश्च्यात आई , वडिल , पत्नी , एक मुलगा , एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे . घटनास्थळी नागरिक व महिलांनी मोठी गर्दि केली होती . अधिक तपास शहापूर पोलीस करीत आहेत .
टिप्पण्या