प्राथमिक विद्यामंदिर, बहीरेवाडी शाळेस संगणक प्रधान उत्साहात संपन्न डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन चे ट्रस्टी व माजी सैनिक यांचे सुपुत्र संदीप चोथे यांचा स्तुत उपक्रमाचा आदर्श इतरानीही घ्यावा.

बहिरेवाडी  ता. आजरा - प्राथमिक विद्यामंदिर,बहिरेवाडी  शाळेस  4 संगणक संच  प्रदान करण्यात आले.माजी सैनिक विष्णू चोथे  बहिरेवाडी यांचे  सुपुत्र असिस्टंट मॅनेजर सेनिकॉर्न टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमीटेड, पुणे व डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन ट्रस्टी संदीप चोथे व डॉ. प्रियांका  चोथे  व चोथे परिवार यांच्या वतीने प्राथमिक विद्यामंदिर, बहिरेवाडी  जिल्हा परिषद  शाळासे भेट देण्यात आले . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  आजी-माजी सैनिक तालुका वेल्फेअर असोसिएशन गडहिंग्लज तालुकाध्यक्ष कुमार पाटील व सचिव रामकृष्ण शेंडे, लोककला महोत्सवाचे प्रमुख  गणपती नागरपोळे सर,डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन व विद्यार्थी विकास परिषद, कोल्हापूर चे अध्यक्ष  डॉ. सचिन  पोवार, शाळा व्यवस्थापन कमिटी चे  अध्यक्ष  अरविद मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत  व ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच रत्नजा सावंत  यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.                      प्रस्ताविक व स्वागत शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्या व ग्रामपंचायत सदस्या  डॉ. उल्का गोरुले यांनी केल. डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन चे  ट्रस्टी संदीप चोथे  म्हणाले, अजूनही ग्रामीण भाग म्हणाव तितका शैक्षणिक शैक्षणिक दृष्ट्या प्रगत झालेल्या नाही.  त्यासाठी आम्ही फाऊंडेशनच्या माध्यमातून  विविध शिक्षण उपयोगीकार्यक्रम घेत असतो. सध्याच आम्ही जिल्हा परिषद शाळेत आयडेटी कार्ड, शैक्षणिक साहित्य वाटप चे कार्यक्रम घेतले आहेत.  आजचा    ह्या कार्यक्रम   आमचे  वडील माजी सैनिक विष्णू  चोथे  व डॉ. पोवार यांच्या प्रेरणेतून  घेऊन  आमच्या गावातील विद्यार्थ्यांना सगनकाचा सखोल अभ्यास व्हावा हा उद्देश ठेवून प्राथमिक शाळा बहिरेवाडीस आज हे 4 संगणक देत आहोत. त्याचा उपयोग सर्वसामान्य विद्यार्थ्यांना हाताळण्यास देऊन विद्यार्थ्यांना कुशल  करण्याचे काम सर्व शिक्षकांचे आहें. आजचे विद्यार्थी हे  उद्या चे देशाचे भविष्य असून  त्याना आजी- माजी सैनिकांचा आदर्श घेऊन प्रेरित व्हावे असे मौलिक मार्गदर्शन त्यानी केले. आजी -माजी सैनिक तालुका वेल्फेअर असोसिएशनचे  गडहिंग्लज तालुकाध्यक्ष कुमार पाटील म्हणाले, आजपर्यंत कोणत्याही माजी सैनिकाच्या कुटुंबाने  प्राथमिक शाळेत एवढी मोठी 4 संगणक ची  मदत केली नाही.ती चोथे  कुटुंबियाकडून पुर्ण झाली. डॉ.पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन व विद्यार्थी विकास परिषद, कोल्हापूर चे अध्यक्ष  डॉ. पोवार,  शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष  अरविंद मिसाळ  यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षा लोकनियुक्त सरपंच सावंत म्हणाल्या,माजी सैनिक विष्णू  चोथे यांनी देशसेवा  करूनही  गावातील मुलांच्या विषयी  असलेले आत्मीयता  दाखवत आजचे  चोथे परिवाराकडून  व ट्रस्टी असलेल्या डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन ने केलेले काम हे स्तुत असून  इतरही लोकांनी  याचा आदर्श घ्यावा असेच आहे. मुख्याध्यापक तुकाराम काटवळ सर  बोलले कि, दिलेल्या 4 संगणक संचाचा निश्चितच विद्यार्थ्यांना उपयोग केला जाईल. व कुशल विद्यार्थी घडवण्याचे काम मी व माझा  शिक्षक स्टाफ निश्चित  करू अशी  हमी दिली. यावेळी बहिरेवाडी  सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुनील चव्हाण, सदस्य जनार्दन कापसे, रामचंद्र कापसे,माध्याळ  सैनिक संघटने सचिव  मीनिन रॉड्रिक्स,अजित मगदुम, उत्तम आयवाळे, प्रीती कांबळे, अरुणा यादव, विठ्ठल कदम, अशोक जोधळे, पाटील सर,संजय पोवार, अमित कडाकणे , ओमकार मिरजकर, आदीसह विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने  उपस्थित होते. सूत्रसंचालन डी एल.चौगले  सर यांनी तर आभार  तानाजी गिरी सर यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.