मानोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस, दोन महिला गेल्या वाहून.
शिवाजी शिंदे
मानवत तालुक्यात मुसळधार पावसाची बॅटिंग; एक महिला बचावली.
मानवत : दि. 10 जून सोमवार रोजी मानवत तालुक्यातील मानोली शिवारात दुपारी चारच्या सुमारास ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला. या ढगफुटी पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात श्रीमती सुनिता धुराजी लव्हाळे (वय 40) या वाहून गेल्या तर रंजना भास्करराव सुरवसे या बचावल्या.दरम्यान, ग्रामस्थांनी पुरात वाहुन गेलेल्या सुनिता लव्हाळे यांचा शोध सुरु केला असून त्या कामी प्रशासनानेही धाव घेतली आहे. तर रंजना सुरवसे यांना बेशुध्द अवस्थेत मानवत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर उपचार करीत आहेत. गेल्या काही तासां पासून या परिसरात ढगाळ वातावरण पसरले होते. पाठोपाठ पावसास प्रारंभ झाला. पावसाने अचानक जोर धरला अन् मुसळधार पावसाने मानोली परिसरास अक्षरशः झोडपून काढले. या प्रकाराने ग्रामस्थ अक्षरशः हादरले आहेत.
टिप्पण्या