आम्रवन महाविहाराचा कायापालट करणार-आमदार मेघना बोर्डीकर यांची ग्वाही.
शिवाजी शिंदे
ज्येष्ठ पौर्णिमे निमित्त धम्मदेसना कार्यक्रम.
परभणी : दि.26 येत्या काळात आपण आम्रवन महाविहार (देवगाव फाटा) या परिसराचा विविध विकास कामांद्वारे कायापालट करु, अशी ग्वाही आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.जिंतूर तालुक्यातील देवगाव येथील आम्रवन महाविहार येथे ज्येष्ठ पोर्णिमेनिमित्त धम्म देसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पूज्य भदन्त संघरत्न, विजय वाकळे, सुमेध सुर्यवंशी, युवराज घनसावंत, रवी डासाळकर, मावली ताटे, दत्तराव नवले, प्रतीक खिल्लारे, सुमनबाई घनसावंत, रोहिदास खंदारे, अमोल वाघ, खिल्लारे सर, विशाल चव्हाण, राहुल शिंदे, रमेश चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलतांना बोर्डीकर म्हणाल्या, आम्रवन महाविहार या ठिकाणी आजपर्यंत न झालेल्या विविध विकास कामां ना चालना दिली जाईल. या ठिकाणी डीपी अभावी असलेला लाईटचा प्रश्न दूर केला जाईल. तसेच देवगाव -फाटा-जिंतूर या मुख्य रस्त्यापासून या धार्मिक स्थळी येण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्याचे काम लवकरच मार्गी लावून या पवित्र स्थळी भगवान गौतम बुध्दांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल, अशी ग्वाही बोर्डीकर यांनी दिली.
दरम्यान, जिंतूर-सेलू मतदारसंघात आमदार बोर्डीकर यांच्याद्वारे विविध विकास कामे मार्गी लावण्यात आली आहे. भविष्यात नक्कीच त्यांच्याद्वारे आम्रवन महाविहार परिसराचा विकास होवून या पवित्र स्थळाला नावलौकिक मिळेल, असा विश्वास पूज्य भदन्त संघरत्न यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार बोर्डीकर यांच्या हस्ते आम्रवन महाविहार परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.
टिप्पण्या