सेलू तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस.
शिवाजी शिंदे
खेर्डा येथे विज पडून तीन शेळ्या दगावल्या. शेतकऱ्याच्या आखाड्यावरील पत्रे उडून गेली.
सेलू : सेलू तालुक्या तील खेर्डा या गावी रात्री झालेल्या पावसाने शेतातील आखाड्यावर वीज पडून तीन शेळ्या जागीच मरण पावल्या व आखाड्यावरील घराचे वरील पत्रे उडून गेल्याने शेतकरी अमोल बालासाहेब काळे यांचे नुकसान झाले दिनांक 16 जून रविवार रोजी रात्री झालेल्या पावसात सेलू तालुक्यातील खेरडा येथील गट नंबर 142 अमोल बालासाहेब काळे यांच्या शेतात रविवार रात्री साडेनऊ ते दहा च्या दरम्यान जोरदार पावसामुळे घरावर वीज कोसळून तीन शेळ्या दगावल्या व घरावरील पत्रे उडून गेली यामध्ये शेतकऱ्याची घरामधील असणारे साहित्य बी बियाणे खत तसेच संसार उपयोगी साहित्य पावसाने भिजले जनावरांच्या अंगावर पत्रे पडल्यामुळे काही जनावरे जखमी झाली पंधरा ते वीस शेळ्या पैकी तीन शेळ्या दगावल्या यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले.
टिप्पण्या