निमशिरगांव येथे गणधरवलय विधानादी मांगलिक कार्यक्रम संपन्न
जयसिंगपूर प्रतिनिधी : निमशिरगांव ता. शिरोळ येथे आचार्य श्री १०८ वर्धमानसागर महाराज , निर्यापकश्रमण धर्मसागरजी महाराज , विद्यासागर महाराज, सिध्दांतसागर महाराज व संघ यांच्या सानिध्यात श्री श्रूतपंचमी श्रूत आराधना व भव्य जैनेश्वरी दीक्षा समारोहाच्या पहिल्या दिवशी गणधरवलय विधान भक्तीमय वातावरणात सानंद संपन्न.
सकाळी मंगल निनाद , मंडप शुध्दी , आहारचर्चा संपन्न झाले. ध्वजारोहन गिरीश पाटील तर मंडपाचे उद्घाटन अभयकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर गणधरवलय विधान 48 बीजाक्षरांचे झाले या विधानास निमशिरगांव तसेच परिसरातील बहुसंख्य श्रावक श्राविका उपस्थित होते. हे विधान प्रामुख्याने जे जैनेश्वरी मुनि दिक्षा ग्रहण करणार आहेत असे दीक्षार्थी श्री विद्याधर पाटील अंकली , राजकुमार जैन बिना मध्यप्रदेश यांनी केले.यावेळी आचार्य वर्धमानसागर महाराज , विद्यासागर महाराज यांचे मंगल प्रवचन झाले. सायंकाळी दीक्षार्थींची विविध सुक्या मेव्यांनी गोदभराई करण्यात आली , सांस्कृतिक कार्यक्रम व संगीत आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या विधानाचे प्रतिष्ठाचार्य अजित भैय्या तर संगीतकार सचिन चौगूले होते .या वेळी निमशिरगांव तसेच महाराष्ट्र , कर्नाटक, मध्यप्रदेश मधील श्रावक श्राविका उपस्थित होते
टिप्पण्या