बॉलीवूड अभिनेत्री.. चित्रा दीक्षित यांची खाकी... लय भारी चित्रपटामध्ये मुख्य भूमिका...

शेवगाव पांडुरंग गोरे - दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचा देशभक्ती वरती आगामी मराठी चित्रपट खाकी ...लय भारी या मराठी चित्रपटांमध्ये बॉलीवूड अभिनेत्री चित्रा दीक्षित यांची खाकी... लय भारी चित्रपटांमध्ये सर्वानुमते निवड करण्यात आली आहे, या निवडीचे पत्र त्यांना दिग्दर्शक पांडुरंग गोरे श्री उद्धव फंगाळ  सर यांनी दिले आहे, 
 रवीशा तेलधुणे यांच्यासोबत बॉलीवूड अभिनेत्री चित्रा दीक्षित परफॉर्मन्स करणार आहेत, पोलीस कथेवर बेतलेला हा सामाजिक मराठी कौटुंबिक , कॉमेडी चित्रपट असून यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री चित्रा दीक्षित व रविशा तेलधुणे यांच्यावरती आला... टांगमोडे हवालदार... तुझ्या जिवाचा मैतर झाला... दोन जीवाची जोडी जिवलग झाली.. हे सॉंग चित्रित होणार आहे व हे सॉंग जबरदस्त झाले आहे, या चित्रपटाची कथा स्टोरी व गाणी दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांनी लिहिली आहे, चित्रा दीक्षित यांचे बॉलीवूड व मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडले आहे व आपल्या अभिनयाच्या जोरावरती मराठीसह हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये शिक्का मोर्तब केला आहे, आज सर्वांच्या पसंतीची नंबर वन सिने अभिनेत्री म्हणून चित्राकडे पाहिले जाते ... तू बघ मागे वळून चित्रा हे सॉंग युट्यूबवरती, टीव्ही चॅनल वरती जबरदस्त गाजले आहे, या एका गाण्यांनी चित्रा दीक्षितला सुपरस्टार बनवले आहे,  खाकी... लय भारी या चित्रपटांमध्ये त्यांची जबरदस्त , गावरान ,कॉमेडी सह सुंदर घायाळ करणारी अदाकारी पाहण्यास प्रेक्षकांना मिळणार आहे,  खाकी... लय भारी हा मराठी चित्रपट दिवाळीपर्यंत चित्रपट थेटर मध्ये झळकणार  आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.