श्रीराम प्रतिष्ठान येथे दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.
शिवाजी शिंदे
सेलू:- येथील श्रीराम प्रतिष्ठान व आर्ट ऑफ लिविंग सेलू यांच्या संयूक्त विद्यमाने दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस (ता.21) वार शुक्रवार रोजी एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश सी.बी.एस.ई स्कूलच्या क्रीडांगणावर पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयजी रोडगे, प्रमुख पाहुणे आर्ट ऑफ लिव्हीगचे योग प्रशिक्षक कैलास कदम, किशोर घडे, हरीश चेचेडिया,रुचिका गुप्ता,संस्थेच्या सचिव डॉ. सौ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, सौ. प्रगती क्षीरसागर, मुख्याध्यापिका सौ.शालिनी शेळके, प्राचार्या डॉ. मीनाक्षी रत्नपारखी, प्रा.अशोक बोडखे, कैलाश ताठे, हरीश कांबळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतांना डॉ. संजय रोडगे म्हणाले, यावर्षी स्वतःसाठी व समाजा साठी योग ही योगा दिन थीम आहे.योग अंगीकारल्यास जीवनातील दैनंदिन प्रश्नांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी मनोबल प्राप्त होते. आरोग्य, मन:शांती, व्यक्तिमत्त्व विकास, नैतिकता अशा सर्वांगीण उन्नतीसाठी व बौद्धिक विकासासाठी योग आवश्यक आहे. एक म्हणजे तो एक व्यायाम प्रकार वाटतो. योग या विषयाकडे अशा रीतीने, नजरेने वरवर पाहिले जाते.शारीरिक व मानसिक अरोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.प्राणायाम हा अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. शारीरिक व मानसिक शक्ती बळकावते आरोग्य तर निरोगी राहतेच पण मन सुद्धा निरोगी राहते. फक्त योग दिनीच योगासन किवा व्यायाम न करता तो दररोज व नियमितपणे करावे.
योग प्रशिक्षक किशोर घडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते वेळी योगाचे महत्व पटवून सांगितले.योग याचा अर्थ जोडणे प्राचीन भारतात शारीरिक व मानसिक आरोग्या साठी चिकित्सक पद्धती म्हणजे योगासन होय.यम, नियम, योगासन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हि योगाची आठ अंगे आहे. यामुळे शरीर व मन शुद्ध होऊन मनाची एकाग्रता वाढते. योग दिना निमित्य ताडासन, वृक्षासन, अर्ध चक्रासन, भद्रासन, वज्रासन, पवन मुक्तासन, शवासन, कपालभाती, ध्यान इ. प्रकारचे योगासन घेऊन त्यांचा जीवनात आरोग्यात कशा प्रकारे फायदा होतो. दररोज योग केल्याने शारीरिक, मानसिक, भावनिक स्वास्थ्य चागले राहिले पाहिजे. आनंद, प्रेम व उत्साह हे तुमच्या जीवनात उत्स्फुर्तपणे व्यक्त होत असतील तर ती खरी आरोग्य संपन्न्ता म्हणता येईल. वजनात घट, ताण तणाव पासून मुक्ती, रोगप्रतिकारक शक्ती, सजगतेने वाढ होते, उर्जा शक्ती वाढते. इ. योग केल्यामुळे हे बदल आपोआप होत असतात. आज या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना संदेश देण्यात आला.या कार्यक्रमामध्ये एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश सी.बी.एस.ई. स्कुल, प्रॉस्पेरिअस पब्लिक इंग्लिश स्कूल, अपूर्वा पॉलीटेकनिक, ज्ञानतीर्थ विद्यालय, उत्कर्ष विद्यालय इ शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संजय ठाकर यांनी केले. आभार प्रा. अशोक बोडखे यांनी केले. यशस्वितेसाठी प्रतिष्ठानच्या सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या