सामाजिक बांधीलकीमुळे मिळाले यश! :- मा. प्रतापराव जाधव
हुपरी सागर पाटील. - ‘हुपरीमध्ये ग्रामपंचायत पासून ते नगरपरिषदमध्ये एक सेवाभावी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले श्री. रामचंद्र मुधाळे हे निस्वार्थ स्वभावामुळे लोकप्रिय आहेत. त्यांनी दमदार आमदार मा. राजूबाबा आवळे यांच्या फंडातुन संत बाळुमामा मंदिरासाठी जी मदत लाभली ती मिळवून देण्यामध्ये कार्यालयीन तांत्रिक कागदोपत्री जी काय मेहनत रामचंद्र मुधाळे यांनी घेतली ती खुप महत्वाची आणि आदर्शवत आहे. एक जीवलग मित्र, सामाजिक भान असणारे व्यक्तीमत्व आणि हुपरी शहराच्या विकासासाठी तत्पर असणारे असे अधिकारी हुपरीला लाभावेत अशी आमची धारणा आहे. अशा कर्मचारी अधिकारी यांच्यामुळे अनेक विकासकामे तडीस नेता येतात. त्यांना त्यांच्या यशाबद्दल हुपरी शहर कॉंग्रेसतर्फे अनेक हार्दिक शुभेच्छा! ’, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे हुपरी शहराध्याक्ष मा. प्रतापराव जाधव यांनी केले. ते श्री. रामचंद्र मुधाळे यांची प्रशासक कर वसुली अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल सन्मानपत्र व पुष्षगुच्छ देवून हुपरी कॉंग्रेस तर्फे सत्कार कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे हातकणंगले तालुका उपाध्यक्ष मा. अनिल म्हातुगडे, शहर उपाध्यक्ष मा. बाबासाहेब गायकवाड, शहरसचिव प्रा. किरण भोसले, कोषाध्यक्ष मा. गजानन पडवळ, मा. बाळासाहेब सपाटे, मा. संभाजी भाणसे, मा. संजय लोहार, मा. उदय बोंगार्डे, मा. सचिन कांबळे (सर), मा. सचिन शिंदे, मा. अरविंद गायकवाड़, मा. धोंडीराम मुधाळे आदि मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या