अभिनेता अनिल गव्हाणे यांची खाकी... लय भारी मराठी चित्रपट मध्ये झळकणार...
शेवगाव पांडुरंग गोरे - प्रतिनिधी खाकी ...लय भारी अहमदनगर जिल्ह्यातील काळया मातीतला रांगडा सिनेमा याकडे पाहिले जात आहे, अहमदनगर जिल्ह्यातील नागेश प्रोडक्शन व आई जगदंबा भवानी मूव्ही प्रोडक्शन निर्मित यांच्या संयुक्त विद्यमानाने , दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचा बहुचर्चित आगामी मराठी चित्रपट देशभक्तीवर आधारित खाकी... लय भारी म्हणजे देशाच्या दुष्शमनासाठी लय डेंजर... या मराठी चित्रपटांमध्ये अभिनेता अनिल गव्हाणे यांची सर्वानुमती निवड करण्यात आली व आहे व त्यांना या चित्रपटांमध्ये पोलीस कमिशनर चा मुख्य रोल देण्यात आला आहे व ही भूमिका त्यांना देण्यात आली आहे,
अभिनेता अनिलजी गव्हाणे यांची मराठी फिल्म इंडस्ट्री मधून अभिनंदन होत आहे, त्यांनी दिग्दर्शक पांडुरंग गोरे , कास्टिंग डायरेक्टर श्री उद्धव फंगाळ सर, सिने अभिनेता रामदास राऊत यांचे आभार मानले आहे व धन्यवाद दिले आहे , या चित्रपटांमध्ये एकूण 42 कलाकारांना यामध्ये भूमिका देण्यात आली आहे, हा चित्रपट डिसेंबर अखेर ख्रिसमीस नाताळ या महत्वपूर्ण सणाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे, सिने अभिनेता अनिल गव्हाणे यांना खाकी ...लय भारी मराठी एक जबरदस्त अभिनय ची झलक पाहायला मिळणार आहे त्यांचे गावातील पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे, त्यांना पुढिल चित्रपटासाठी हार्दिक, हार्दिक शुभेच्छा...
टिप्पण्या