खाकी ...लय भारी चित्रपटांमध्ये अभिनेता भिमसेन चव्हाण झळकणार आमदार साहेबांच्या भूमिकेत...( बोला तो... बोला हा डायलॉग करणार फेमस...)
शेवगाव पांडुरंग गोरे- दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचा आगामी खाकी ...लय भारी हा मराठी चित्रपट लवकरचं चित्रीकरणासाठी सज्ज होत आहे व या मराठी चित्रपटांमध्ये रावसाहेब मोहिते - पाटील या आमदाराच्या कॅरेक्टरसाठी पुणे येथे दिग्गज सेलिब्रिटी सिने अभिनेता भिमसेन चव्हाण सर यांना श्री उद्धव फंगाळ सर,दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांच्याकडून नियुक्त करण्यात आले व त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे व या चित्रपटांमध्ये त्यांची निगेटिव्ह रोल आहे व यामध्ये ते आमदार रावसाहेब मोहिते - पाटील हे कॅरेक्टर साकारणार आहेत. ( बोला तो..बोला चूप रहने का ) हा जबरदस्त डायलॉग ते फेमस करणार आहेत. रावसाहेब मोहिते - पाटील हे आमदार कॅरेक्टर वरून देशभक्तीचा भाव असला तरी यामध्ये त्यांची खलनायकी निगेटिव्ह शेड्स प्रेक्षकांना पाहता येणार आहे व या चित्रपटांमध्ये ते आपली जान जीवाची बाजी लावून ही भूमिका ते निभावणार आहेत व या भूमिकेसाठी ते खूप इंटरेस्टिंग असून त्यांनी दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांच्याकडून संपूर्ण स्टोरी ऐकून घेतली आहे व ते या चित्रपटांमध्ये मुख्य खलनायकाच्या तोडीस... तोड भूमिकांनी होणार आहे व चित्रपटातील प्रेक्षकांना एक सुखद धक्का देणार आहेत या चित्रपटांमध्ये त्यांची खलनायकी आमदारकीची भूमिका असल्याने त्यांच्या चाहता वर्ग हा सुखावला आहे व त्यांच्या फॅन फॉलर्स मध्ये वाढ झाली आहे. या चित्रपटांनी निवडीबद्दल मराठी फिल्म इंडस्ट्रीज सह मराठी सिरीयल मधून त्यांचे अभिनंदन होत आहे. आजवर त्यांनी झी मराठी वाहिनीवरील कारभारी लयभारी या लोकप्रिय मालिकेत आमदार ही भूमिका साकारली आहे. कोलकत्ता इंटर नॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दोषी कोण ? या लघु चित्रपटातील आमदार साहेब या भूमिकेसाठी त्यांना एकूण सोळा पुरस्कार सोहळा मिळाले असून युट्यूबवर ४२ हजार चाहत्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे. त्याचबरोबर या चित्रपटांमध्ये मुंबई येथील दिग्गज सिने अभिनेत्री चित्रा दीक्षित यांच्यासोबतही त्यांची भूमिका असल्याने या चित्रपटांमध्ये दोघांची केमिस्ट्री कशी चालते याकडे आता मराठी फिल्म इंडस्ट्रीचे लक्ष लागले आहे. कारण हा चित्रपट देशभक्ती वरती आधारित असल्याने या चित्रपटाकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचा खाकी... लय भारी मराठी चित्रपट लवकरचं महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक कमाई करणार आहे , चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाईची आकडे दाखवणार आहे....
टिप्पण्या