नाईट कॉलेजच्या खेळाडूंचे राष्ट्रीय ड्रॅगन बोट स्पर्धेत नेत्रदीपक यश .

यड्राव (प्रतिनिधी )  :  देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ अँड कॉमर्स, इचलकरंजी मधील खेळाडू अभय शिवानंद कुचेकर बी. ए. भाग दोन व कुमार रवींद्र मिठारी बी. ए. भाग तीन यांनी पंजाबी विद्यापीठ, चंदीगड येथे झालेल्या अखिल भारतीय अंतर्विद्यापीठ ड्रॅगन बोट स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करीत रौप्य पदक प्राप्त केले. 
       सदर स्पर्धा पंजाबी विद्यापीठ चंदिगड येथे संपन्न झाल्या. स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातील 104 विद्यापीठांच्या संघानी सहभाग घेतलेला होता. यामध्ये शिवाजी विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व करत दोन्ही खेळाडूंनी हे यश संपादित केले. 
        अखिल भारतीय अंतर्विद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धेत दोन्ही खेळाडूंना मिळालेल्या यशाबद्दल इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटचे चेअरमन श्री राहुल खंजिरे, प्राचार्य डॉ. पी. डी. नारे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.