वाचन उपक्रम राबवणाऱ्या शाळांना पुस्तक पेटी भेट.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

जि.प. प्रा. शाळा कडसावंगी व मालेगाव तांडा येथे 100 पुस्तकांची ग्रंथ पेटी भेट.

परभणी : दि. 2 मे
उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये ग्रंथालयातील पुस्तकांशी मैत्री करून पुस्तक वाचनाचा आनंद घेणाऱ्या जिंतूर तालुक्यातील जि प प्रा शाळा कडसावंगी आणि जि प प्रा शाळा मालेगाव तांडा या दोन शाळांना *होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज*
(एचएआरसी) संस्थेतर्फे आनंदी ग्रंथ वाचन पेटी भेट देण्यात आली.या संस्थेमार्फत आनंदी ग्रंथ वाचन पेटी भेट देण्याचा उपक्रम मागील काही दिवसापासून सुरू आहे. आतापर्यंत परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यातील 91 शाळांना ही आनंदी ग्रंथ वाचन पेटी लोकसहभागातून भेट देण्यात आली आहे.
यावेळी कार्यक्रमाचे  प्रमुख अतिथी एचए आरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक, अँड. प्रवीण कालानी, संदीप भडे,अक्षर आनंद चे जिल्हा समन्वयक प्रकाश डूबे, डॉ. अनुप सारडा, संदीप सारडा हे उपस्थित होते. यावेळी एचएआरसी अध्यक्ष डॉ पवन चांडक म्हणाले की "विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचून पुस्तकात काय आवडले ते लिहून वाचलेल्या कथेवर आधारित नवीन कथा तयार कराव्यात असे सांगितले". अक्षर आनंद वाचन चळवळचे जिल्हा समन्वयक प्रकाश डूबे यांनी विद्यार्थ्यांना पुस्तक बचत बँके बद्दल माहिती दिली तसेच उन्हाळ्याची सुट्टी पुस्तकांशी गट्टी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी व अक्षर आनंद ई-बालमासिका साठी विद्यार्थ्यांनी कथा कविता पाठविण्याचे आवाहन केले. वाढदिवसाच्या निमित्ताने दातृत्व जवळाबाझार येथील संजयजी लाहोटी यांनी स्वतःच्या वाढदिवसा च्या निमित्ताने 'आनंदी वाचनपेटी' साठी आर्थिक मदत देऊन ही  ग्रंथ वाचनपेटी जि प शाळा कडसावंगी येथे देण्यात आली. संजय मामडे यांच्या आर्थिक मदतीतून आनंदी ग्रंथ वाचनपेटी जि प प्रा शाळा मालेगाव तांडा येथे देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी डॉ पवन चांडक, प्रकाश डुबे, संदीप भंडे, प्रवीण कालानी, संदीप सारडा, अनिल स्वामी, किशोर तळेकर, राजश्री स्वामी, भगवान अंभोरे, पवन आढे यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी,
पालक व गावकरी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.